२०वा हफ्ता जमा होण्यासाठी या चुका टाळा, अन्यथा थांबेल आर्थिक लाभ PM Kisan Yojana 20th Installment

2 Min Read
PM Kisan Yojana 20th Installment Update

PM Kisan Yojana 20th Installment Update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता जाहीर होण्याची प्रतिक्षा देशभरातील लाखो शेतकरी करत आहेत. पिएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये आर्थिक मदत सरकारकडून थेट बँक खात्यात पाठवली जाते. आत्ता पर्यंत या योजनेचे १९ हप्ते वितरित करण्यात आले असून, आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २०वा हप्ता जमा होणार आहे.

शेतकऱ्यांना २०वा हप्ता कधी मिळेल?

पिएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जमा झाला होता. त्यामुळे सरकारने २०वा हप्ता जूनमध्ये जमा करण्याची शक्यता माध्यमांमध्ये व्यक्त होत आहे. मात्र, सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

PM Kisan Yojana 20th Installment | हप्ता अडकन्यामागील मुख्य कारण

PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा हप्ता थांबू शकतो:

  • ई-केवायसी पूर्ण नसेल तर हप्ता जमा होणार नाही.
  • जमिनीचे दस्तावेज अपलोड व पडताळणी केली नसेल तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
  • बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास निधी थेट खात्यात येणार नाही.
  • अर्जात चूक असल्यास, तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता असते.
  • खात्यात DBT ऑन नसल्यास सुद्धा लाभ थांबतो.

शेतकऱ्यांनी काय करावे?

शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, आपले बँक खाते आणि आधारची माहिती तपासावी, आणि भूलेख माहिती व्यवस्थित अपलोड केली आहे याची खात्री करावी. वरील गोष्टी वेळेत केल्यास २०वा हप्ता जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 १५ वर्षे पूर्ण झाल्यावर मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे का आवश्यक आहे? जाणून घ्या.

Share This Article