ई-केवायसी करणे अनिवार्य; वेळेत पूर्ण न केल्यास लाभ बंद, Ekyc कशी करायची? जाणून घ्या PM Kisan Yojana Ekyc

2 Min Read
Pm Kisan Yojana Ekyc Last Date Installment Warning

PM Kisan Yojana Ekyc Last Date Installment Warning : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा लाभ घेत असलेल्या करोडो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी (eKYC) आणि भूलेख सत्यापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

देशभरात अनेक शेतकरी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने ही अट लागू केली आहे. योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांत एकूण ६,००० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेच्या १९ हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे.

Pm Kisan Yojana Ekyc कशी करायची?

शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘eKYC’ पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपला १२ अंकी आधार क्रमांक व आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर भरावा लागेल. नंतर मोबाइल नंबरवर येणारा OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करता येते.

ही ऑनलाईन प्रक्रिया अतिशय सोपी असून शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. ही ई-केवायसी पूर्ण केल्यावरच पुढील हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.

सरकारचा उद्देश

या नव्या अटीमुळे अपात्र लाभार्थी योजनेतून आपोआप वगळले जातील व केवळ पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल, असा सरकारचा उद्देश आहे. तसेच, भूलेखांची पडताळणी केल्यामुळे बोगस नोंदणी टाळता येणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 गिग कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन होणार; लाखो डिलिव्हरी बॉय, रायडर्सना दिलासा.

Share This Article