Ladki Bahin Yojana April-May Installment Update : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. मे महिना सुरू झाल्यानंतरही निधी जमा न झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र आता एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते एकत्रित म्हणजे 3000 रुपये एकावेळी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याआधी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित दिला होता. त्यामुळे यंदाही सरकार एप्रिल आणि मे महिन्याचे 1500-1500 रुपये एकत्र देणार असल्याची चर्चा आहे. सध्या राज्यातील 2 कोटी 47 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. त्या सर्वजणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
लाडकी बहीण योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे. या योजनेतून दरमहा 1500 रुपयांची मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतुन वगळण्यात येत आहे.
जुलै 2024 पासून आतापर्यंत एकूण 9 हप्ते वितरित करण्यात आले असून, एप्रिल आणि मेचा हप्ता एकत्र दिल्यास तो दहावा हप्ता ठरेल. त्यामुळे राज्यातील कोट्यवधी लाभार्थीं सरकारकडून स्पष्ट तारखेची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
🔴 हेही वाचा 👉 मिळणार दरमहा ३००० रुपये; पात्रता, अटी व नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या.