Ladki Bahin Yojana April Installment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. सुमारे २ कोटी ४७ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळतो. एप्रिलचा हप्ता ३० एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी जमा होईल, अशी माहिती आधी समोर आली होती. मात्र आजपर्यंत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झालेले नाहीत, त्यामुळे लाभार्थींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आश्वासन
महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केल आहे की, “लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.” मात्र त्यांनी हप्त्याची नेमकी तारीख अद्याप जाहीरच केलेली नाही. त्यामुळे महिलांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विभागाने सुरू केली प्रक्रिया
महिला व बाल विकास विभागाने एप्रिल महिन्याचा दहावा हफ्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत पैसे खात्यात जमा होतील, अशी शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्याचे 3000 रुपये एकत्रच देण्यात येणार असल्याची बातमी काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. पण त्या बातमीस अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सोशल मीडियावर महिलांचा संताप
अक्षय तृतीयेला हप्ता न मिळाल्यामुळे अनेक महिलांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी थेट सरकारवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री अदिती तटकरे यांच आश्वासन महिलांसाठी दिलासादायक ठरत आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी!.