Maharashtra Board 10th 12th Result 2025 Latest Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2025 मधील दहावी (SSC) व बारावी (HSC) बोर्ड परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा राज्यभरातून जवळपास 30 लाख विद्यार्थी या परीक्षांना बसले होते. सध्या विद्यार्थी व पालक निकालाच्या अधिकृत तारखेची वाट पाहत असून, निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइट्सवर त्यांचे प्रोव्हिजनल गुणपत्रक पाहता येणार आहे. या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर व आईचे नाव वापरून लॉगिन करून निकाल पाहता येईल. मूळ गुणपत्रक काही दिवसांनी संबंधित शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
मागील वर्षांच्या निकालाच्या तारखा पाहता, 2024 मध्ये दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता, तर 2023 मध्ये तो 2 जून रोजी आला होता. त्यामुळे यंदाही निकाल मे महिन्याच्या उत्तरार्धात येईल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात बोर्ड लवकरच अधिकृत घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे.
निकालानंतर जर विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नसतील, तर त्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येतो. हे अर्ज जून 2025 मध्ये स्वीकारले जातील. तसेच, जे विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरतील, त्यांच्यासाठी जुलै 2025 मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण आवश्यक असतात. यामध्ये थिअरीत किमान 28 गुण आणि प्रॅक्टिकल/इंटरनल मूल्यांकनामध्ये स्वतंत्र उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.
बोर्डाकडून विद्यार्थ्यांना सतत सूचित केले जात आहे की, त्यांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांवरच विश्वास ठेवावा. इंटरनेटवर पसरवल्या जाणाऱ्या अफवा व बनावट लिंकपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. निकालाच्या सर्व अधिकृत अपडेट्ससाठी mahahsscboard.in व mahresult.nic.in या संकेतस्थळांना नियमितपणे भेट द्या.
🔴 हेही वाचा 👉 घरबसल्या मिळवा तुमच पीव्हीसी आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!.