Tractor Subsidy Scheme SC Self Help Group Maharashtra 2025 : राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाने एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत स्वयंसहायता बचत गटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ३.१५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. विशेषतः शेतीसाठी आवश्यक असलेल्या मिनी ट्रॅक्टरसाठी हे अनुदान उपयुक्त ठरणार आहे.
Tractor Subsidy Scheme कोणती कागदपत्रे लागतात?
Tractor Subsidy योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांकडे खालील प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे असणे आवश्यक आहे:
बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र
राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याचे पासबुकचे झेरॉक्स
सदस्यांची फोटोसह यादी (बँकेद्वारे प्रमाणित)
अध्यक्ष, सचिव आणि किमान ८०% सदस्यांचे जात प्रमाणपत्र
सदस्यांचे रहिवासी दाखले किंवा स्वयंघोषणापत्र
सदस्यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड
ट्रॅक्टर खरेदीचा सामूहिक ठराव व गट स्थापनेचा ठराव
बैठकीचे सामूहिक छायाचित्र
योजनेचे फायदे आणि अटी
Tractor Subsidy योजनेअंतर्गत फक्त तेच गट पात्र ठरतील, ज्यामध्ये किमान ८०% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असतील. हे मिनी ट्रॅक्टर गटाच्या नावे दिले जाते आणि त्याचा उपयोग सदस्यांना सामूहिक शेतीसाठी करता येतो.
कृषीमशिनरीसाठी सरकारी मदत
मिनी ट्रॅक्टरसारख्या यंत्रसामग्रीमुळे शेतीचे काम अधिक सुलभ होते. त्यामुळे उत्पादनक्षमता वाढते आणि ग्रामीण भागातील आर्थिक स्वावलंबनास चालना मिळते. सरकारी अनुदानामुळे गटांना मोठ्या आर्थिक गुंतवणुकीशिवाय अत्यावश्यक यंत्र खरेदी करता येते.
🔴 हेही वाचा 👉 Mahadbt Farmer : महाडीबीटी शेतकरी योजना 2025-26 अपडेट, आता लाभासाठी लॉटरी नाही, “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य”.