CM Fellowship Maharashtra 2025 Apply Online: अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे; पात्र तरुणांना शासनासोबत कामाची संधी

2 Min Read
CM Fellowship 2025 Apply Last Date May 5 Photo: (PTI)

CM Fellowship 2025 Apply Last Date May 5 : राज्यातील उच्चशिक्षित, उत्साही आणि परिवर्तनशील विचारसरणी असलेल्या तरुणांसाठी पुन्हा एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली असून इच्छुक उमेदवारांना 5 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

हा फेलोशिप कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून साकार झाला असून या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये थेट प्रशासनासोबत काम करण्याची संधी दिली जाते. या कार्यक्रमाचा उद्देश प्रशासनात नवउद्योग, संशोधन, धोरण निर्मिती आणि अंमलबजावणी प्रक्रियेत युवकांचा सक्रीय सहभाग वाढवणे हा आहे.

CM Fellowship Maharashtra 2025 Registration अर्ज करण्याचे निकष:

भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
सामाजिक भान असलेले, प्रशासनात रस असलेले आणि राज्याच्या प्रगतीत योगदान देण्याची इच्छाशक्ती असलेले उमेदवार प्राधान्याने निवडले जातील.
उमेदवाराचे वय, अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि व्यक्तिमत्त्व या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येते.

फेलोशिपचे फायदे:

शासनाच्या विविध योजनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
धोरण तयार करणे व अंमलबजावणीत सक्रिय योगदान.
मानधन आणि प्रमाणपत्राच्या स्वरूपात प्रोत्साहन.
भविष्यकाळात प्रशासकीय किंवा धोरणात्मक क्षेत्रात करिअरसाठी भक्कम पाया.

फेलोशिपच्या तपशीलवार अटी, शर्ती, नियुक्ती प्रक्रिया आणि अभ्यासक्रमासंबंधी माहिती maharashtra.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

CM Fellowship Maharashtra 2025 Registration Last Date : अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: 5 मे 2025.

🔴 हेही वाचा 👉 पीएम आवास योजनेचे नियम बदलले; आता यांनाही मिळणार लाभ.

Share This Article