PM Awas Yojana Fraud Complaint Process 2025 : भारत सरकारच्या पिएम आवास योजना या योजनेअंतर्गत अनेक गरजू कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही योजना गरीब, भूमिहीन किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांसाठी आशेचा किरण ठरली आहे. मात्र, काही ठिकाणी या योजनेच्या नावावर पैसे उकळण्याचे प्रकार समोर येत आहेत.
जर कोणी एजंट किंवा स्थानिक अधिकारी योजनेत नाव लावून देतो म्हणून तुमच्याकडून पैसे मागत असेल, तर लगेचच त्याविरोधात तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.
सरकार शुल्क घेत नाही – फसवणुकीपासून स्वतःला वाचवा!
प्रधानमंत्री आवास योजना ही पूर्णतः मोफत सेवा आहे. लाभ मिळवण्यासाठी कुठलही शुल्क अथवा लाच द्यायची गरज नाही. म्हणून जर कोणी पैशांची मागणी करत असेल, तर तो सरळसरळ गैरप्रकार आहे.
कुठे आणि कशी करायची तक्रार?
तुम्ही ग्रामपंचायत, तालुका कार्यालय, जिल्हा प्रशासन किंवा राज्यस्तरावरील विभाग याठिकाणी तक्रार करू शकता.
तक्रारीवर ४५ दिवसांच्या आत कार्यवाही करण्याचे सरकारचे धोरण आहे.
जर इतक्यातही निर्णय झाला नाही, तर स्थानिक आवास सहायक किंवा प्रखंड विकास अधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधावा.
कोण पात्र?
पिएम आवास योजनेचा लाभ खालील नागरिकांना मिळतो:
ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत आहे.
ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही.
इतर काही श्रेणींसाठी उत्पन्न मर्यादा वेगळी असते.
पंतप्रधान आवास योजना ही गरजूंना घर मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. मात्र या योजनेच्या नावावर आर्थिक फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा. अशा प्रकारांना बळी न पडता, योग्य ठिकाणी तक्रार करून न्याय मिळवा.
🔴 हेही वाचा 👉 आधारमध्ये पत्ता बदलायचा आहे? सोप्या पद्धतीने अशा प्रकारे करा अपडेट.