PAN कार्डवर मिळत ₹5 लाखांच वैयक्तिक कर्ज Pan Card Loan

3 Min Read
Pan Card Loan Up To 5 Lakhs India

Pan Card Loan Up To 5 Lakhs India : देशभरात डिजिटल व्यवहार वाढले असतानाच आर्थिक गरजांनाही नवे पर्याय मिळत आहेत. विशेषतः तातडीच्या गरजांसाठी वैयक्तिक कर्जाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेकांना माहितीही नाही की केवळ PAN कार्डच्या आधारे देखील ₹5 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज सहज मिळू शकते. हे कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि ते PAN कार्डशी जोडलेले असले पाहिजे.

PAN कार्ड म्हणजे केवळ ओळखीचा दस्तावेज नव्हे, तर ते तुमच्या आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकतेचे आणि विश्वासार्हतेचे प्रतीक ठरले आहे. भारत सरकारच्या आयकर विभागामार्फत जारी होणारा हा १० अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आज जवळपास प्रत्येक बँक खात्याशी जोडलेला असतो. त्यामुळे, केवायसी प्रक्रियाही जलद आणि सुलभ झाली आहे. आधार कार्डशी लिंक झाल्यानंतर PAN कार्डाद्वारे कर्ज प्रक्रिया आणखी सहज आणि सुरक्षित बनते.

जर तुमच्याकडे आधार कार्डसह वैध PAN कार्ड असेल आणि ते एकमेकांशी लिंक केलेले असेल, तर वैयक्तिक कर्जाची रक्कम २४ तासांच्या आत तुमच्या खात्यात ट्रान्सफर होऊ शकते. मात्र, दोन्ही कागदपत्रे लिंक नसतील, तर कर्ज प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आधी ते लिंक केले आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.

या प्रकारच्या कर्जासाठी ओळख व पत्त्याचा पुरावा आवश्यक असतो. ओळख पुराव्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र चालतात, तर पत्त्याच्या पुराव्यासाठीही यापैकी कुठलाही एक दस्तावेज ग्राह्य धरला जातो. त्याशिवाय, मागील तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि दोन महिन्यांचे वेतन प्रमाणपत्र किंवा फॉर्म १६ ही कागदपत्रे कर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असतात.

कर्ज घेणाऱ्या अर्जदाराचे वय २१ ते ६० वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, नियमित उत्पन्न असणे आणि चांगला क्रेडिट स्कोअर असणे महत्त्वाचे आहे. नोकरदार तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींना हे कर्ज सहज मिळू शकते, मात्र त्यांचा Debt-to-Income (DTI) अनुपात ४०% पेक्षा कमी असणे आवश्यक मानले जाते. उदाहरणार्थ, जर मासिक उत्पन्न ₹५०,००० असेल आणि त्यामधून ₹२८,००० कर्ज किंवा इतर कर्जाच्या EMI साठी जात असेल, तर DTI ५६% होतो, जे वित्तीय संस्थांसाठी अनुकूल मानले जात नाही.

PAN कार्डाचा उपयोग केवळ कर्जासाठीच नाही, तर इन्कम टॅक्स भरताना, ₹५ लाखांहून अधिकची मालमत्ता खरेदी करताना, वाहन खरेदी-विक्री करताना, क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना, बँक खात उघडताना, शेअर बाजार व म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आणि ऑनलाइन व्यवसाय सुरू करताना देखील अनिवार्य असतो.

जर तुम्ही सध्या कोणत्याही तातडीच्या आर्थिक अडचणीत असाल आणि पात्र असाल, तर केवळ तुमचे PAN व आधार कार्ड वापरून तुम्ही सहजपणे ₹५ लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. यासाठी विविध बँका आणि NBFC कंपन्या त्यांच्या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देतात, जिथे केवळ काही तपशील भरून अर्ज सादर करता येतो.

🔴 हेही वाचा 👉 योजनेच्या नावावर पैसे मागणाऱ्यांपासून सावध! अशी करा तक्रार आणि मिळवा तत्काळ न्याय.

Share This Article