Duplicate Pan Card Online Process : पॅन कार्ड हे भारतातील प्रत्येक करदात्यासाठी अत्यावश्यक दस्तऐवज आहे. परंतु अनेकदा हे कार्ड हरवणे, चोरीला जाणे किंवा खराब होणे यासारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत घाबरून न जाता काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास तुम्हाला सहज नवीन डुप्लिकेट पॅन कार्ड मिळू शकते. आयकर विभागाने ही प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे.
पॅन कार्ड हरवल्यास काय कराव?
जर तुमच पॅन कार्ड हरवल असेल किंवा चोरीला गेल असेल, तर सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR (प्रथम माहिती अहवाल) नोंदवावा. हे पाऊल आवश्यक आहे कारण हरवलेल्या कार्डचा कुणी गैरवापर करू शकत.
तुमचा PAN नंबर विसरला आहे का? पुन्हा अस शोधा:
तुम्हाला तुमचा PAN नंबर आठवत नसेल, तर आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर ‘Know Your PAN’ सुविधा आहे. तिथ नाव, जन्मतारीख आणि वडिलांचे नाव टाकून पुन्हा नंबर शोधता येतो.
डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया (Step-by-Step):
- सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाइट
onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html ला भेट द्या. - त्यासाठी तुमच्याकडे तुमचा पॅन नंबर आणि आधार कार्ड नंबर तयार ठेवा.
- वेबसाईटवर जाऊन तुमच नाव, जन्मतारीख, आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
- पुढे तुमचा पत्ता आणि पिन कोड तपासा व कंफर्म करा.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो टाका आणि पुढे जा.
- आता 50 रुपये फी भरावी लागते. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक Acknowledgement Slip मिळते.
- ही स्लिप जपून ठेवा, या स्लिपमुळे तुम्ही नवीन पॅन कार्डच ट्रॅकिंग करू शकता.
पॅन कार्ड हरवलं तरी काळजी करू नका, वरील पद्धतीने तुम्ही काही मिनिटांत नवीन डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करू शकता. तुमच नवीन पॅन कार्ड तुम्हाला लवकरच पोस्टाने पाठवल जाईल.
🔴 हेही वाचा 👉 नीळ्या रंगाच आणि पांढऱ्या रंगाच्या आधार कार्डमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.