Aadhaar SIM Check: तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह आहेत? फक्त 2 मिनिटांत अस तपासा

1 Min Read
Check Active Sim On Aadhaar Tafcop Process

Check Active Sim On Aadhaar Tafcop Process : आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड ही एक महत्त्वाची ओळख बनली आहे. बँक खाते उघडताना, सरकारी योजनांचा लाभ घेताना किंवा नवीन सिम कार्ड खरेदी करताना आधारची गरज भासते. मात्र, अनेकदा तुमच्या आधार कार्डाचा गैरवापर करून दुसरा एखादा व्यक्ती सिम खरेदी करतो, आणि अशा सिमचा गैरवापर केल्यास तुम्हाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

म्हणूनच, तुमच्या आधारवर किती सिम कार्ड्स अ‍ॅक्टिव्ह आहेत, हे तपासण अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती मिळवण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी झाली आहे.

तुमच्या आधारवर किती सिम कार्ड अ‍ॅक्टिव्ह आहेत हे जाणून घेण्याची प्रक्रिया:

  1. सर्वप्रथम https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड भरून “Request OTP” या बटणावर क्लिक करा.
  3. तुमच्या नंबरवर आलेला OTP भरून लॉगिन करा.
  4. लॉगिन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर सर्व अ‍ॅक्टिव्ह नंबरची यादी दिसेल, जे तुमच्या आधार कार्डवर जारी आहेत.
  5. जर यादीत कोणताही अपरिचित नंबर दिसला, तर तात्काळ टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअरला संपर्क करून तो नंबर ब्लॉक करा.

आधार-संबंधित सिम सुरक्षेचे महत्त्व

  • गैरवापर झाल्यास फसवणूक, ओटीपी चोरी, आर्थिक नुकसान यांसारख्या गोष्टी घडू शकतात.
  • म्हणूनच वेळोवेळी आधारशी लिंक असलेल्या सिम कार्ड्सची माहिती तपासण गरजेच आहे.

🔴 हेही वाचा 👉 लग्नानंतर आधार कार्डमध्ये आडनाव बदलायचय? जाणून घ्या आवश्यक कागदपत्र आणि प्रक्रिया.

Share This Article