Aadhaar Pan News : भारतीय नागरिकांसाठी लवकरच एक महत्त्वाचा डिजिटल बदल होत आहे. केंद्र सरकार एक असा युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी सिस्टम आणत आहे, ज्या अंतर्गत आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट यांसारखी सर्व ओळखपत्र एकाच पोर्टलवरूनच एकत्र अपडेट करता येणार आहेत.
आजवर या कागदपत्रांमध्ये बदल करायचा झाला, तर वेगवेगळ्या वेबसाइट्सवर अर्ज करावा लागत असे. कधी कधी अर्ज रखडला की कार्यालयांचे फेरेही मारावे लागत. पण लवकरच हे सगळ सुलभ होणार आहे.
एकाच पोर्टलवर सर्व अपडेट्स
PTI या वृत्तसंस्थेनुसार, सरकार सध्या अशा एका इंटीग्रेटेड पोर्टलवर काम करत आहे, जे एकाच वेळी आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स व पासपोर्ट यांच व्यवस्थापन करू शकेल. सध्या या पोर्टलच ट्रायल रन सुरू असून, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी एक पूर्णपणे सुरक्षित प्रणाली विकसित केली जात आहे.
या पोर्टलवर नागरिकांना वेगवेगळे पर्याय मिळणार आहेत — जस की पत्ता बदल, मोबाईल नंबर अपडेट, नावात बदल व इतर डिटेल्समध्ये आवश्यक सुधारणा. एकदा प्रक्रिया पूर्ण झाली की, संबंधित कागदपत्र पोस्टाने थेट घरी पोहोचवली जातील. यासाठी थोड शुल्क आकारल जाऊ शकत.
घरपोच मिळणार अपडेट केलेल डॉक्युमेंट
जर नागरिकांनी पोस्टाद्वारे नव्या कार्डाची मागणी केली, तर ते ७ दिवसांमध्ये त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचवण्यात येईल. त्याऐवजी जर कार्यालयातून डॉक्युमेंट घ्यायच ठरवल, तर पोर्टलवरूनच तारीख व वेळ निवडता येईल.
सध्या कसा केला जातो आधारमध्ये बदल?
सध्या आधारमध्ये पत्ता किंवा इतर माहिती बदलण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाव लागत. तिथे ‘Update Your Aadhaar’ या पर्यायातून वापरकर्ते त्यांच्या डिटेल्स अपडेट करू शकतात. मोबाईल ओटीपी व आधार नंबरच्या सहाय्याने पत्ता किंवा नावामध्ये योग्य ते बदल करता येतात. पण या प्रक्रियेस वेळ लागतो, आणि प्रत्येक कागदपत्रासाठी वेगळी वेबसाईट वापरण्याची अडचण आहे.
नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर ही प्रक्रिया केंद्रीकृत होणार आहे. नागरिक एकाच जागी आपली सर्व ओळखपत्र अपडेट करू शकतील आणि तेही कमी वेळेत, अधिक सोप्या पद्धतीने आणि अधिक सुरक्षितपणे.
🔴 हेही वाचा 👉 आधार, पॅन, रेशन कार्ड आता नागरिकत्वाचे पुरावे राहिले नाहीत?.