आधार नोंदणी केंद्रांचे परवाने एका रात्रीत रद्द! राज्यातील अनेक केंद्र चालक संकटात Aadhaar Center License Cancellation News 2025

3 Min Read
Aadhaar Center License Cancelled Maharashtra News 2025

Aadhaar Center License Cancelled Maharashtra News 2025 : महाराष्ट्रातील हजारो आधार केंद्र चालकांवर बेरोजगारीच संकट कोसळल आहे. महिला व बालविकास विभागासह शिक्षण खात्याद्वारे सुरू असलेली आधार नोंदणी प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून थांबलेली आहे. विशेष म्हणजे “चाणक्य” या सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा करार संपल्यानंतर नव्या कंपनीची नेमणूक झालेली नाही, आणि यामुळे ग्रामीण भागासह शहरांतील आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत.

७५९ आधार केंद्रांचा करार संपुष्टात, केंद्र चालक झाले बेरोजगार

मागील काही वर्षांपासून महाआयटी (MahaIT) या शासकीय संस्थेमार्फत आधार नोंदणीच काम सुरळीतपणे चालू होत. विशेषतः गरोदर महिला, लहान बालके, वृद्ध नागरिक, आणि इतर लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार नोंदणी अत्यावश्यक होती. मात्र, अचानक परवाने रद्द झाल्याने ७५९ केंद्रांची कामकाज व्यवस्था एका रात्रीत थांबवण्यात आली आहे.

पूर्वसूचना न देता थेट बंदी; आधार केंद्र चालक आक्रमक

परवाने रद्द करताना केंद्र चालकांना कोणतीही पूर्वसूचना न देण्याची गंभीर चूक प्रशासनाकडून झाली आहे. केंद्र चालकांची मागणी आहे की, जर सरकारने नवी कंपनी नेमलीच, तर त्याच अनुभवी आधार चालकांना पुन्हा संधी द्यावी. अनेकांनी या कार्यासाठी ५०,००० रुपयांची अनामत रक्कम महाआयटीकडे भरलेली आहे, तीही अद्याप परत करण्यात आलेली नाही.

सरकारी योजनांची अंमलबजावणी ठप्प

गेल्या अनेक दिवसांपासून पोषण ट्रॅकर, डीबीटी (DBT), शाळा-पूर्व लाभ योजना यांसारख्या योजनांची अंमलबजावणी ग्रामीण भागात आधार नोंदणी केंद्रांच्या माध्यमातून होत होती. मात्र आता केंद्र बंद झाल्याने गरजू नागरिकांचे आधार अपडेट किंवा नवीन नोंदणी होऊ शकत नाही. परिणामी, योजनांचा लाभही थांबला आहे.

खाजगी कंपनीकडे काम जाणार?

महिला व बालविकास विभागाने आता काही आधार केंद्र चालकांना संच परत करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. परंतु संबंधित संच हे महाआयटी मार्फत देण्यात आले होते, आणि त्याबद्दल चालकांकडून भरलेली रक्कम व याआधी केलेल्या कामाचा हिशोब शिल्लक आहे. त्यामुळे यामागे आधार नोंदणीच काम एखाद्या खाजगी कंपनीकडे देण्याचा डाव असल्याचा आरोप आधार केंद्र चालकांकडून केला जात आहे.

शासनाकडे मागणी: पुन्हा परवाने देऊन रोजगार द्या

केंद्र चालकांनी शासनाकडे वारंवार निवेदनं दिली असून, अनामत रक्कम परत मिळावी, आणि आधार परवाने पुन्हा सुरू करून रोजगाराची संधी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे. अन्यथा, हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

🔴 हेही वाचा 👉 रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! 28 तासात करा हे काम, नाहीतर कार्डवरून नाव गायब!.

Share This Article