RBI ₹100 ₹200 Notes Update: आता एटीएममधून मोठ्या नोटांसोबत लहान मूल्याच्या नोटाही (₹100 व ₹200) सहज मिळणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही काळात नागरिकांकडून तक्रार होती की, एटीएममधून मोठ्या नोटा विशेषतः 500 च्या नोटा जास्त प्रमाणात येतात, ज्यामुळे व्यवहार करताना अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने आता टप्प्याटप्प्याने सर्व एटीएममध्ये ₹100 आणि ₹200 च्या नोटा भरन बंधनकारक केल आहे.
आरबीआयच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देशातील 75% एटीएममध्ये किमान एका कॅसेटमधून लहान मूल्याच्या नोटा मिळाल्या पाहिजेत. तर 31 मार्च 2026 पर्यंत 90% एटीएममध्ये ही अंमलबजावणी पूर्ण व्हावी लागणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana Good News.
व्हाईट लेबल एटीएम म्हणजे काय?
व्हाईट लेबल एटीएम हे खासगी कंपन्यांकडून चालवले जाणारे एटीएम्स आहेत. यातून ग्राहक बँकेप्रमाणेच पैसे काढू शकतात, बॅलेन्स तपासू शकतात आणि इतर व्यवहार करू शकतात. आता या एटीएम्सलाही लहान नोटा भरन अनिवार्य करण्यात आल आहे.
Rbi च्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून आता सर्व ATM मधून ₹100 व 200 रुपयांच्या नोटा सहज उपलब्ध होतील.
🔴 हेही वाचा 👉 आधार नोंदणी केंद्रांचे परवाने एका रात्रीत रद्द! राज्यातील अनेक केंद्र चालक संकटात.