Aadhaar Name DOB Update Rules UIDAI : आधार कार्ड हे सध्या भारतातील सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. सरकारी योजना, बँकिंग सेवा, शैक्षणिक प्रवेश, गुंतवणूक आणि विविध सरकारी तसेच खाजगी सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. मात्र आधार बनवताना करताना किंवा त्यानंतर अनेकदा नाव, जन्मतारीख किंवा इतर तपशीलांमध्ये चुकीची माहिती नोंदवली जाते. त्यामुळे अशा चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे गरजेचे ठरते. परंतु भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI ने आधारमधील नाव व जन्मतारीख दुरुस्त करण्याच्या संख्येला मर्यादा घातली आहे. तुम्हाला ही माहिती आधीच माहित असल्यास पुढे कोणतीही अडचण येणार नाही.
UIDAI च्या नियमानुसार आधार कार्डधारक त्यांच्या नावात जास्तीत जास्त दोन वेळा दुरुस्ती करू शकतात. नावात स्पेलिंगची चूक, आडनावाचा अभाव किंवा नावामध्ये टायपो असल्यास ओळखपत्र अथवा गॅझेटेड नोटिफिकेशनद्वारे नाव सुधारता येते. मात्र तिसऱ्यांदा नावात बदल करायचा झाल्यास UIDAI ची विशेष परवानगी आवश्यक असते आणि ती सामान्य प्रक्रियेमधून करता येत नाही.
जन्मतारीख किंवा वयामध्ये बदल करण्यासाठी अधिक कठोर नियम आहेत. आधार कार्डात जन्मतारीख फक्त एकदाच दुरुस्त करता येते. जर चुकीची तारीख छापून आली असेल, किंवा जन्मतारीख नोंदलेली नसेल, तर एकदाच ती दुरुस्त करता येते. यासाठी जन्मतारीख प्रमाणित करणारे अधिकृत कागदपत्र सादर करणे आवश्यक असते. त्यानंतर UIDAI पुन्हा बदल करण्याची परवानगी देत नाही.
आधार मध्ये या प्रकारचे बदल करण्यासाठी आधार सेवा केंद्राला प्रत्यक्ष भेट देणे गरजेचे असते. संबंधित फॉर्म भरून, आवश्यक कागदपत्रे सादर करून आणि बायोमेट्रिक पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण केली जाते. यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेले शुल्क आकारले जाते.
यामुळेच आधारसंबंधी कोणतीही समस्या टाळण्यासाठी प्रत्येकाने आपली माहिती अचूक आणि अपडेट ठेवणे गरजेचे आहे. चुकीची माहिती असल्यास सरकारी सेवांचा लाभ घेण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे आवश्यक ते बदल ठरलेल्या नियमांच्या अंतर्गत आणि अधिकृत पुराव्यांच्या आधारेच करावेत.
🔴 हेही वाचा 👉 तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड अॅक्टिव्ह आहेत? फक्त 2 मिनिटांत अस तपासा.