Aadhar Card Birth Date Update Without Birth Certificate : अनेक नागरिकांच्या आधार कार्डावर चुकीची जन्मतारीख नोंदलेली असते. जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला नसल्यामुळे ती दुरुस्त करणे अशक्य वाटते. मात्र यासाठी आता चिंता करण्याची गरज नाही. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा जवळच्या जन सेवा केंद्रात जाऊन आधारमधील जन्मतारीख सहज बदलता येते.
अनेक सरकारी आणि खासगी सेवांसाठी आधार कार्ड हे महत्त्वाच ओळखपत्र आहे. त्यामुळे त्यामधील सर्व माहिती योग्य असण अत्यावश्यक आहे. जर तुमच्या आधार कार्डावर चुकीची जन्मतारीख नोंदलेली असेल आणि तुमच्याकडे जन्म दाखला किंवा शाळेचा दाखला नसेल, तरीही तुम्ही इतर वैध कागदपत्रांच्या आधारे ही माहिती अपडेट करू शकता.
आधार कार्ड मधील जन्मतारीख अपडेट करण्यासाठी काय कराव लागेल?
UIDAI च्या सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल वर जाऊन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडू शकता. यासाठी तुम्हाला तुमची खरी जन्मतारीख असलेल एखादं वैध डॉक्युमेंट अपलोड कराव लागेल.
तसेच, तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्र, पोस्ट ऑफिस किंवा जन सेवा केंद्रात जाऊनही ही प्रक्रिया करता येते.
कुठले डॉक्युमेंट चालतात?
जर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळेचा दाखला नसेल, तर वैकल्पिक स्वरूपात तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र किंवा मेडिकल सर्टिफिकेट वापरू शकता, ज्यावर तुमची खरी जन्मतारीख असते.
UIDAI केवळ एकदाच जन्मतारीख अपडेट करण्याची परवानगी देते, त्यामुळे माहिती अचूक आणि पूर्णपणे पडताळलेली असण गरजेच आहे. चुकीच्या डेटामुळे तुमच्यावर सरकारी योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे वेळेत दुरुस्ती करण गरजेच आहे.
🔴 हेही वाचा 👉 तुमच्या पॅन कार्डवर कुणीतरी तुमच्या नावाने परस्पर लोन घेतलय का? घरबसल्या अस तपासा.