Akola Ration Card Application Status On Whatsapp : रेशनकार्डशी संबंधित कामांसाठी वारंवार सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात, त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त होतात. ही अडचण लक्षात घेऊन अकोल्यातील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने (FDO Office) एक अभिनव उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ५ मे २०२५ पासून अकोला शहर विभागात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत रेशनकार्ड अर्जाची माहिती आता थेट व्हाट्सॲपवर मिळणार आहे.
नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या रेशनकार्ड अर्जाची पावती FDO कार्यालयाच्या अधिकृत WhatsApp क्रमांकावर पाठवली, की त्या अर्जावर काय कार्यवाही झाली, त्यात काही त्रुटी आहेत का, किंवा काम पूर्ण झाले आहे का – ही सर्व माहिती दोन दिवसांत व्हाट्सॲपद्वारे मिळणार आहे.
कोणत्या कामांची माहिती व्हाट्सॲपवर मिळणार?
नवीन रेशनकार्डसाठी अर्ज
दुय्यम रेशनकार्डसाठी अर्ज
रेशनकार्डवरील नाव कमी करणे
नवीन नाव समाविष्ट करणे
या उपक्रमामुळे नागरिकांना आता कार्यालयात प्रत्यक्ष भेट देण्याची गरज राहणार नाही. अर्जानंतरची स्थिती थेट व्हाट्सॲपवर मिळणार असल्याने वेळ आणि त्रास वाचणार आहे. अन्नधान्य वितरण कार्यालयाने या सुविधेची अंमलबजावणी सुरू केली असून, यामुळे प्रशासनाचा डिजिटल आणि उत्तरदायी चेहरा समोर येतोय.
🔴 हेही वाचा 👉 Tractor Subsidy Scheme 2025 : ट्रॅक्टर खरेदीसाठी ३.१५ लाखांचे अनुदान.