Atal Bandhkam Kamgar Awas Yojana News : बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेतर्गत आता जमीन खरेदीसाठी मिळणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम ५० हजार रुपयांवरून थेट १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा कामगारांसाठी आहे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन किंवा घर नाही. बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या नावावर जमीन खरेदीसाठी ही रक्कम एकदाच (one-time) दिली जाते.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या मुख्य अटी:
- अर्जदार बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असावा.
- अर्जाच्या वेळी किमान तीन वर्षांची वैध नोंदणी असावी.
- अर्जदाराने अद्याप कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांसह जमीन खरेदीबाबतची प्राथमिक माहिती सादर करावी लागते.
बांधकाम कामगारांसाठी अन्य उपयुक्त उपक्रम:
– राज्यातील कामगार सुविधा केंद्रांतून बांधकाम कामगारांसाठी सर्व योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया व ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते.
– जिल्हा नियोजन निधीतून आदिवासी व अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी सौर ऊर्जेवरील उपाय, घरकुल वाटप, विहिरींची मंजूरी यांसारखी कामेही सुरू आहेत.
– “सर्वांसाठी घरे” उपक्रमांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्यांचे नियमितीकरण करून देण्याची प्रक्रिया देखील सुलभ करण्यात येणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 बांधकाम कामगारांसाठी महत्वाच! नोंदणीसाठी ९० दिवसांच प्रमाणपत्र हवं आहे? येथे वाचा सोपी माहिती.