Atal Pension Yojana Marathi Guide Benefits Apply : वयाच्या 60व्या वर्षानंतर नियमित उत्पन्नाची खात्री हवी असेल, तर केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर नागरिकांना दर महिन्याला ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत पेन्शन मिळू शकते. ही योजना खासगी क्षेत्रातील कर्मचारी, असंघटित कामगार व लघुउद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्यांसाठी फायदेशीर मानली जाते.
कोण अर्ज करू शकतो?
अटल पेन्शन योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतात. यासाठी अर्जदाराचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. योजनेत सहभागी झाल्यावर प्रीमियम रक्कम वयोमानानुसार ठरते.
Atal Pension Yojana वैशिष्ट्ये
- सरकारद्वारे चालवली जाणारी विश्वसनीय पेन्शन योजना
- वयाच्या 60 वर्षांनंतर आयुष्यभर पेन्शन
- ₹1,000, ₹2,000, ₹3,000, ₹4,000 व ₹5,000 पर्यंत मासिक पेन्शन पर्याय
- योजनेत गुंतवलेली रक्कम व लाभ मिळणाऱ्या पेन्शनवर कर सवलत मिळते
अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
१. जवळच्या बँकेत जा:
तुमच्या बँकेच्या शाखेला भेट द्या आणि अटल पेन्शन योजनेसंदर्भात चौकशी करा.
२. आवश्यक कागदपत्रे द्या:
- आधार कार्ड
- बँक खात्याची माहिती
- मोबाईल क्रमांक
३. पेन्शन प्लान निवडा:
बँक कर्मचारी तुम्हाला विविध पेन्शन पर्यायांची माहिती देतील. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही प्लान निवडू शकता. म्हणजे तुम्हाला महिन्याला किती रुपये पेन्शन पाहिजे ते निवडा: ₹1,000 पासून ₹5,000 पर्यंत.
४. खाते लिंक करा:
बँक अधिकारी तुमचे खाते अटल पेन्शन योजनेशी लिंक करतील आणि दर महिन्याला तुमच्या खात्यातून निश्चित प्रीमियम आपोआप वजा केला जाईल.
🔴 हेही वाचा 👉 रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! 28 तासात करा हे काम, नाहीतर कार्डवरून नाव गायब!.
अटल पेन्शन योजनेचा लाभ कुणाला मिळतो?
- जे सरकारी पेन्शन योजनेच्या कक्षेबाहेर आहेत
- खासगी नोकरी, छोटे व्यवसाय, किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार
- भविष्याचा आर्थिक आधार शोधणारे तरुण नागरिक
🔴 हेही वाचा 👉 ₹100 व ₹200 च्या नोटांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय, सामान्य नागरिकांना दिलासा.