Ayushman Card Benefits Eligibility Process : भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) देशातील गरीब, गरजू व वंचित नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा पुरवते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. यासाठी गरज आहे ती फक्त आयुष्मान कार्ड (Ayushman Card) बनवण्याची.
आता प्रश्न उरतो कि हे आयुष्मान कार्ड कसे बनवावे? कोण पात्र आहे? आणि हे कार्ड मिळाल्यानंतर नेमके कोणते फायदे मिळतात? खाली त्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे:
आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?
१. सीएससी केंद्रावर जा:
आपल्या जवळच्या CSC (Common Service Center) किंवा स्थानिक आरोग्य केंद्रावर जावा.
२. पात्रता तपासणी:
तुमची आधारकार्ड, रेशनकार्ड, मोबाईल नंबर व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन जा. तुमची पात्रता तपासली जाईल.
३. कागदपत्रे जमा करा:
पात्र ठरल्यानंतर तुमची कागदपत्रे जमा करून व्हेरिफाय केली जातील.
४. अर्ज प्रक्रिया पूर्ण:
सर्व माहिती व कागदपत्रे योग्य असल्यास तात्काळ अर्ज केला जातो आणि काही वेळात तुमचे आयुष्मान कार्ड तयार होते.
५. कार्ड डाउनलोड:
कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही Ayushman Bharat Yojana पोर्टलवरून कार्ड डाउनलोड करू शकता किंवा केंद्रावरून प्रिंट घेऊ शकता.
आयुष्मान कार्डचे फायदे काय आहेत?
₹५ लाखांपर्यंत मोफत उपचार:
वर्षभरात ५ लाख रुपये पर्यंतच्या आरोग्य उपचारांचा खर्च सरकार करते.
देशभरातील सूचीबद्ध रुग्णालयांत उपचार:
आयुष्मान कार्डधारकांना सरकारी व खाजगी सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये (Empanelled Hospitals) उपचार घेता येतात.
कुटुंबातील सर्व सदस्यांना कव्हर:
एकाच कार्डवर संपूर्ण कुटुंबाचा समावेश केला जातो, त्यामुळे प्रत्येक सदस्य पात्र ठरतो.
निशुल्क व कॅशलेस सेवा:
रुग्णालयात पैसे भरावे लागत नाहीत — सर्व प्रक्रिया कॅशलेस असते.
कोण पात्र आहे?
SECC-2011 यादीतील कुटुंबे
अंत्योदय योजनेचे लाभार्थी
बीपीएल (BPL) कार्डधारक
समाजाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी तिघा भावांनी निधी वळवल्याचे उघड.