७० वर्षांवरील सर्व नागरिकांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार Ayushman Vay Vandana Yojana

2 Min Read
Ayushman Vay Vandana Yojana Elderly Free Treatment

Ayushman Vay Vandana Yojana Elderly Free Treatment : सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले असून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ या योजनेअंतर्गत नव्या ‘आयुष्मान वय वंदना योजने’ची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक १० लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य उपचार पूर्णतः मोफत घेऊ शकणार आहेत.

सरकारच्या या नव्या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणीमुळे आरोग्यसेवा टाळावी लागणार नाही. केंद्र सरकारच्या PM-JAY योजनेद्वारे ५ लाख रुपयांपर्यंत आणि दिल्ली सरकारतर्फे अतिरिक्त ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळणार आहे. हे संपूर्ण कव्हरेज कॅशलेस स्वरूपात असेल, ज्यामुळे लाभार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये भरती होताना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.

मात्र, सध्या ही योजना केवळ दिल्लीचे मूळ रहिवासी असलेल्या नागरिकांसाठीच लागू करण्यात आली आहे. लवकरच ही योजना ईतर राज्यात लागू केली जाण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांकडे वैध आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, सामाजिक आणि आर्थिक दर्जा काहीही असो या योजनेचा लाभ सर्व ७० वर्षांवरील नागरिकांना मिळणार आहे.

सध्या दिल्लीतील जवळपास १०० रुग्णालये या योजनेशी जोडलेली असून, त्या ठिकाणी लाभार्थ्यांना मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. या योजनेसाठी beneficiary.nha.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करता येते. याशिवाय, आयुष्मान भारत अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करूनही रजिस्ट्रेशन करता येते.

🔴 हेही वाचा 👉 Google Pay वरून मिळवा ३० हजार ते १२ लाख रुपयांपर्यंत कर्ज.

Share This Article