१५ वर्षे पूर्ण झाल्यावर मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे का आवश्यक आहे? जाणून घ्या Aadhaar Update

2 Min Read
Child Aadhaar Update At Age 15 Biometric Guidelines

Child Aadhaar Update : लहान मुलांना सरकारी योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ही एक अत्यावश्यक ओळखपत्र प्रणाली बनली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार कार्ड दिले जाते. मात्र, त्यानंतर मुलांचे बायोमेट्रिक तपशील म्हणजेच बोटांचे ठसे, चेहरा आणि डोळ्यांचे नमुने वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक असते.

सरकारच्या नियमांनुसार, मूल ५ वर्षांचे झाल्यावर प्रथम आणि १५ वर्षांचे झाल्यावर दुसऱ्यांदा बायोमेट्रिक तपशील नोंदवणे बंधनकारक आहे. कारण, या वयोगटात बायोमेट्रिक डिटेल्समध्ये नैसर्गिक बदल होतात आणि जुनी माहिती बदलू शकते. त्यामुळे शैक्षणिक, आर्थिक आणि शासकीय सेवांचा लाभ घेताना अडचण येऊ नये म्हणून आधार अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे.

आधार बायोमेट्रिक अपडेट मोफतच!

पालकांनी जवळच्या आधार सेवा केंद्रात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करावे. बायोमेट्रिक अपडेट विनामूल्य आहे, मात्र नाव किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास नाममात्र शुल्क लागू शकते. आधारसाठी बालकाचा जन्मदाखला, हॉस्पिटलमधील डिस्चार्ज स्लिप वा इतर ओळखपत्र आवश्यक असते.

🔴 हेही वाचा 👉 नीळ्या रंगाच आणि पांढऱ्या रंगाच्या आधार कार्डमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.

UIDAI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जे बालक ५ किंवा १५ वर्षांचे झाले आहेत, त्यांचे तात्काळ आधार बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. कारण, या बदलांमुळे भविष्यातील शासकीय योजनांचा लाभ अचूक माहितीच्या आधारावर मिळवता येतो.

🔴 हेही वाचा 👉 राज्यातील ‘या’ बांधकाम कामगारांना मिळणार ६ हजार रुपये.

Share This Article