लाडक्या बहिणींच्या हप्त्यावर फडणवीसांची चुप्पी; “निकालाची वाट बघा” म्हणत प्रश्न टाळला CM Fadnavis On Ladki Bahin Yojana

2 Min Read
CM Fadnavis On Ladki Bahin Yojana April Installment Update

CM Fadnavis On Ladki Bahin Yojana April Installment Update : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याच्या प्रगतीविषयी आत्मविश्वास व्यक्त करताना ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित केला. मात्र, ‘लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार?’ या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट उत्तर देण टाळत चर्चेला वळण दिल.

फडणवीस म्हणाले, “निकालाची वाट बघा”

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ या योजनेअंतर्गत लाभार्थींना अपेक्षित असलेल्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, “जो शंभर दिवसांचा उपक्रम दिला होता, त्याचा निकाल येत आहे. त्या निकालाची वाट बघा आणि तो निकाल सर्वांपर्यंत पोहोचवा.” या उत्तराने हप्त्याच्या तारखेबाबत कोणतीही ठोस माहिती न देता त्यांनी विषयावर चुप्पी साधल्याचे दिसून आले.

सामनातील टीकेला फडणवीसांची टोलेबाजी

शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रात विचारलेल्या “महाराष्ट्र कणखर राहिला का?” या प्रश्नावर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी “काहीतरी ठेवा… कुठला दिवस आणि कुणाबद्दल विचारता” असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वर अप्रत्यक्ष टीका केली.

“ट्रिलियन डॉलर महाराष्ट्राचा संकल्प”

ध्वजारोहण कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र हा देशाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावत आहे. आता आपण ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करणार आहोत.”

🔴 हेही वाचा 👉 ई-केवायसी करणे अनिवार्य; वेळेत पूर्ण न केल्यास लाभ बंद, Ekyc कशी करायची? जाणून घ्या.

Share This Article