Construction Worker Registration Process Maharashtra 2025: महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कामगारांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ही नोंदणी (Bandhkam Kamgar Yojana Registration) करताना, कामगारांनी कमीत कमी ९० दिवस बांधकाम क्षेत्रात काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
९० दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र कोण देतो?
गावात राहणाऱ्या कामगारांसाठी ग्रामसेवक हे प्रमाणपत्र देऊ शकतात. याबाबत शासनाने २०१७ मध्येच निर्णय घेतलेला असून ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकृत अधिकार आहे.
शहरांमध्ये काय प्रक्रिया आहे?
शहरी भागात नोंदणीसाठी स्थानिक प्राधिकरण, ठेकेदार किंवा अधिकृत संस्था बांधकाम कामगारांना संबंधित ९० दिवसांचे प्रमाणपत्र देऊ शकतात.
का आवश्यक आहे हे प्रमाणपत्र?
हे प्रमाणपत्र मिळाल्यावर कामगारांना घरकुल योजना, आरोग्य सुविधा, अपघात विमा, शिक्षण सहाय्य, आणि विविध आर्थिक लाभ मिळू शकतात. नोंदणी झाल्यावर कामगार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा थेट लाभ घेऊ शकतो.
लक्षात ठेवा:
- ९० दिवसांचे सतत काम असणे आवश्यक नाही. एकूण ९० दिवसांचे काम चालते.
- कामगाराने कोणत्या प्रकल्पात, कोणत्या कालावधीत काम केले याचा तपशील आवश्यक असतो.
- नोंदणी केल्यानंतर सुरक्षाकवच कार्ड, संसार किट, किंवा इतर शासकीय मदतीचा लाभ मिळू शकतो.
कामगारांनी काय करावे?
- आपल्या परिसरातील ग्रामसेवक, नगरसेवक, बांधकाम साइटवरील सुपरवायझर किंवा मान्यताप्राप्त संस्था यांच्याशी संपर्क साधावा.
- आपल्या कामाचे पुरावे (वेतन पावत्या, ठेकेदाराचा पत्र, कामाचे फोटो, साक्षीदार इ.) एकत्र करावेत.
- ऑनलाइन किंवा स्थानिक बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन फॉर्म भरावा.
🔴 हेही वाचा 👉 एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात घट; उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना मोठा दिलासा.