राज्यातील ‘या’ बांधकाम कामगारांना मिळणार ६ हजार रुपये Construction Workers Pension Scheme Maharashtra 2025

1 Min Read
Construction Workers Pension Scheme Maharashtra 2025

Construction Workers Pension Scheme Maharashtra 2025 : महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या भवितव्याचा विचार करून राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच बांधकाम क्षेत्रातील ६० वर्षांवरील नोंदणीकृत कामगारांना दरवर्षी ६ हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे. या योजनेसाठी नियमावली तयार केली जात असून, फक्त पात्र व नोंदणीकृत कामगारांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी सांगितले की, पेन्शनसाठी आधार कार्ड किंवा कंत्राटदारांनी दिलेले पुरावे ग्राह्य धरण्याबाबत अभ्यास सुरू आहे. कारण अनेक ठिकाणी बोगस कामगारांची नोंदणी झाल्याचे समोर आले असून, अशा नोंदी रोखण्यासाठी विभाग विशेष नियोजन करत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कामगार विभाग नियमावलीच्या अंतिम टप्प्यावर काम करत आहे. बांधकाम ठिकाणी बहुतांश कामगार हे कंत्राटदारांच्या माध्यमातून काम करत असल्यामुळे, यामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

कामगार विभागाने १०० दिवसांच्या कार्ययोजनेअंतर्गत माथाडी कामगार विधेयक, खासगी सुरक्षा क्षेत्रातील सुधारणा आणि उद्योग धोरणाबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलल्याची माहितीही आय. ए. कुंदन यांनी दिली. तसेच बांधकाम कामगार पेन्शन योजनेसह इतर योजनाही (Bandhkam Kamgar Yojana) वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

🔴 हेही वाचा 👉 आता फक्त ५ दिवसांत मिळणार इलेक्ट्रिक दुचाकींसाठी अनुदान; असा करा अर्ज.

Share This Article