Blue And White Aadhar Card : नीळ्या रंगाच आणि पांढऱ्या रंगाच्या आधार कार्डमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

2 Min Read
Difference Between Blue And White Aadhar Card

Difference Between Blue And White Aadhar Card : आधार कार्ड हे आज प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वाधिक महत्त्वाच ओळखपत्र ठरल आहे. पण अनेकांना माहित नसेल की आधार कार्डाचे वेगवेगळ्या वयोगटांनुसार प्रकारही असतात. विशेषतः नीळ्या रंगाच ‘बाल आधार’ कार्ड आणि सर्वसामान्य पांढऱ्या रंगाच आधार कार्ड यात फरक आहे. यामधील नेमकी वेगळी वैशिष्ट्य काय आहेत, हे आज आपण येथे समजून घेणार आहोत.

पांढऱ्या रंगाच आधार कार्ड म्हणजे काय?

पांढऱ्या रंगाच आधार कार्ड हे अशा नागरिकांसाठी जारी केल जात, ज्यांच वय पाच वर्षांपेक्षा अधिक आहे. या कार्डासाठी अर्ज करताना व्यक्तीची जनसांख्यिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख) सोबत बायोमेट्रिक डेटा घेतला जातो. या बायोमेट्रिक डेटामध्ये बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅन घेतले जातात. त्यामुळे हे कार्ड अधिक वैध आणि अचूक ओळख पुरवणार मानल जात.

नीळ्या रंगाच आधार कार्ड कशासाठी असत?

नीळ्या रंगाच ‘बाल आधार कार्ड’ विशेषतः पाच वर्षांखालील लहान मुलांसाठी दिल जात. याला ‘बाल आधार’ असही म्हटल जात. या कार्डासाठी फक्त जनसांख्यिक माहिती आणि फोटो घेतले जातात. लहान वयात बायोमेट्रिक डेटामध्ये सातत्याने बदल होऊ शकतो, म्हणून ५ वर्षांखालील मुलांचा बायोमेट्रिक डेटा घेतला जात नाही.

बाल आधारचा उद्देश असा आहे की लहान मुलांनाही सरकारी सेवांचा लाभ मिळावा आणि त्यांची अधिकृत ओळख नोंदवली जावी.

सरकारकडून बाल आधार सुरू केल्यामुळे लहान मुलांसाठीही आरोग्यसेवा, शैक्षणिक नोंदणी, किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे झाले आहे. नंतर लहान मुलांचे वय ५ पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक अपडेटसह बाल आधारचे सामान्य आधारमध्ये रूपांतर करता येते.

Share This Article