Good News Ladki Bahin Yojana April Installment Latest Update : लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या लोकप्रिय योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काही महिलांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान जाहीर करण्यात आलेली आणि तातडीने लागू झालेली लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे जमा केले जातात.
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता
सद्यस्थितीत एप्रिल महिन्यासाठी दहावा हप्ता (10th Installment) पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 एप्रिल रोजी असणाऱ्या अक्षय्य तृतीया पर्यंत हा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या महिलांना मिळणार नाही लाभ?
अजित पवार यांनी रत्नागिरीत झालेल्या भाषणात स्पष्ट केल की, ज्या महिलांच वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांच्या वर आहे, अशा महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात येत आहे. त्यामुळे अशा महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही. शिवाय, एका पेक्षा अधिक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही योजनेतून वगळल जात आहे.
पैसे जमा झाले की नाही? अस तपास स्टेटस
लाडकी बहीण योजनेचा लाभ खात्यात जमा झाला आहे की नाही, हे तुम्ही खालीलप्रमाणे तपासू शकता:
- बँकेकडून SMS येईल.
- बँकेच्या टोल फ्री नंबरवर मिस्ड कॉल देऊन खात्याची माहिती मिळवा.
- नेट बँकिंग, UPI अॅप्स (Google Pay, PhonePe) वापरून बँक बॅलन्स तपासा.
- ATM वर जाऊन “लास्ट ट्रांझॅक्शन” तपासा.
- किंवा थेट बँकेत जाऊन खात्याच स्टेटमेंट तपासा.
लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण येत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मात्र, अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही योजना “भाऊबीज आणि रक्षाबंधनाची भेट” म्हणून सुरू करण्यात आली असून ती कायम सुरूच राहणार आहे, असही त्यांनी सांगितल.
🔴 हेही वाचा 👉 आता करा आधार आणि पॅन अपडेट एकाच पोर्टलवर, केंद्र सरकारचा नवा उपक्रम.