Google Pay Personal Loan : डिजिटल पेमेंट क्षेत्रात अग्रेसर असलेले ‘गुगल पे’ आता कर्ज क्षेत्रात देखील पुढे सरसावले आहे. गुगल पे वापरकर्त्यांना आता ३० हजार ते १२ लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज सहजपणे मिळू शकणार आहे. यासाठी कंपनीने देशातील विविध बँकांशी भागीदारी केली असून, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे.
कोणाला मिळणार Google Pay Loan?
Google Pay Personal Loan Emi Interest Details: गुगल पे द्वारे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान २१ वर्ष असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे नियमित उत्पन्नाचे स्रोत असणे गरजेचे आहे. कर्जासाठी अर्ज करताना कोणतेही हार्ड कॉपी डॉक्युमेंट्स देण्याची गरज नाही, कारण संपूर्ण प्रक्रिया KYC व ई-साइनच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.
किती व्याज लागणार आणि किती कालावधीचा कर्ज पर्याय?
गुगल पे द्वारे देण्यात येणाऱ्या कर्जावर १०.५०% ते १५% पर्यंत वार्षिक व्याजदर आकारण्यात येतो. हा व्याजदर अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर च्या आधारे ठरतो. कर्जाचा कालावधी ६ महिन्यांपासून ५ वर्षांपर्यंत ठेवण्यात आला आहे, त्यामुळे वापरकर्त्यांना परतफेडीसाठी योग्य पर्याय निवडता येतो.
Google Pay कर्जासाठी अर्ज कसा करायचा?
Google Pay अॅप उघडल्यानंतर “Money” टॅबमध्ये “Loans” सेक्शनमध्ये जावा. तेथे उपलब्ध असलेल्या वैयक्तिक कर्जाच्या ऑफर्स तपासून पाहा. योग्य पर्याय निवडून पुढील प्रक्रिया पूर्ण करा. KYC अपलोड केल्यानंतर आणि ई-साइन केल्यानंतर, मंजूर झालेली रक्कम थेट संबंधित खात्यात जमा केली जाते.
EMI कसा वसूल केला जातो?
गुगल पेद्वारे मंजूर झालेले कर्ज परतफेड करण्यासाठी मासिक EMI तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून ऑटो-डेबिटद्वारे कापला जातो. कोणतीही पेनल्टी टाळण्यासाठी खाते शिल्लक पुरेशी असणे महत्त्वाचे आहे. EMI संबंधित तारीख व रक्कम अर्जाच्या वेळी स्पष्टपणे सांगितली जाते.
🔴 हेही वाचा 👉 या योजनेत दरमहा १५०० रुपये गुंतवून बनू शकता लखपती.