How To Identify Fake 500 Note In India : भारतात व्यवहारात सर्वाधिक वापरली जाणारी नोट म्हणजे ₹५०० ची. मात्र नुकतच 500 रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तुमच्याकडे असलेली ५०० रुपयांची नोट खरी आहे की बनावट, हे ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण अत्यावश्यक आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने प्रमाणित केलेल्या खऱ्या नोटांमध्ये विशिष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश असतो. प्रत्येक खऱ्या नोटेवर RBI च्या गव्हर्नरची सही असते आणि नोटेच्या मागील बाजूस लाल किल्ल्याची छबी असते. याशिवाय या नोटेचा अधिकृत आकार ६६ मिमी बाय १५० मिमी इतका असतो, जो बनावट नोटांमध्ये अचूक जुळत नाही.
खऱ्या नोटेच्या मध्यभागी एक सूक्ष्म धागा असतो, ज्यावर ‘भारत’, ‘RBI’ आणि ‘₹५००’ अशा अक्षरांचा नमुना असतो. विशेष म्हणजे नोट तिरकी धरल्यावर मध्यभागी असणाऱ्या धाग्याचा हिरवा रंग निळ्या रंगात बदलतो, हे वैशिष्ट्य खऱ्या नोटेच महत्त्वाच वैशिष्ट्य मानल जात. नोटेच्या उजव्या बाजूस देवनागरीत ‘५०० रुपये’ असे छापलेले असते आणि महात्मा गांधींचा वॉटरमार्क स्पष्टपणे दिसतो. तसेच इंग्रजीत ‘RESERVE BANK OF INDIA’ ही अक्षरेही स्पष्ट असतात.
घाईत व्यवहार करताना अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होण स्वाभाविक आहे, पण नकली नोट हातात पडल्यास आर्थिक नुकसान होऊ शकत. त्यामुळे कोणतीही ₹५०० ची नोट घेताना तिची तपासणी करणे आणि शंका असल्यास ती जवळच्या बँकेत नेऊन खात्री करणे आवश्यक आहे.
🔴 हेही वाचा 👉 हफ्त्याची रक्कम पाहून लाडक्या बहिणींनी दाखल केली पोलिसात तक्रार, सरकारवर फसवणुकीचा आरोप.