तुमच बँक खात झालय ‘निष्क्रिय’? अस करा पुन्हा अ‍ॅक्टिव्ह Bank Account Reactivation Process

2 Min Read
Inactive Bank Account Reason And Reactivation Process

Inactive Bank Account Reason And Reactivation Process : अनेक वेळा अस होत कि आपली एकापेक्षा अधिक बँक खाती असतात आणि आपण केवळ प्रायमरी (मुख्य) खात्यातच व्यवहार करत राहतो. त्यामुळे दुसऱ्या खात्यातील व्यवहार बंद पडतो आणि ते खात निष्क्रिय (Inactive) होत. ही स्थिती खातेधारक आणि बँक दोघांसाठीही अपायकारक ठरू शकते.

निष्क्रिय खाते म्हणजे काय?

जर एखाद्या बँक खात्यामध्ये सतत २ वर्षे कोणताही व्यवहार (क्रेडिट किंवा डेबिट) झाला नसेल, तर ते खाते बँकेच्या नियमानुसार निष्क्रिय घोषित केल जात. एकदा खात निष्क्रिय झाल की, त्या खात्यातून कोणताही व्यवहार करता येत नाही.

निष्क्रिय खात्यातील रक्कम सुरक्षित असते का?

होय. निष्क्रिय खात्यामध्ये जर काही रक्कम शिल्लक असेल, तर ती रक्कम खात्यामध्येच राहते आणि त्यावर नियमित व्याजही मिळत. त्यामुळे निष्क्रिय खात्यातील पैसे बँकेत सुरक्षित असतात.

निष्क्रिय खाते पुन्हा अ‍ॅक्टिव्ह कसे करायचे?

आपण निष्क्रिय खाते पुन्हा नियमित वापरात आणू शकतो. यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागते:

  • आपल्या बँकेच्या शाखेला भेट द्या
  • केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करा – आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारख्या ओळखपत्रांची गरज लागेल.
  • जर खाते जॉइंट अकाउंट (संयुक्त खाते) असेल, तर दोन्ही खातेदारांनी बँकेत प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे आहे.
  • कोणतेही शुल्क आकारले जात नाही – हे खाते पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करताना बँक कोणताही चार्ज घेत नाही.

महत्त्वाच : खाते निष्क्रिय होणे टाळा

बँक खात निष्क्रिय होऊ नये यासाठी दर १-२ महिन्यांनी कमीतकमी एक व्यवहार करा – जसे की ₹१ चे ट्रान्सफर, मोबाईल रीचार्ज, किंवा कोणताही छोटा व्यवहार.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता अजूनही नाही; अदिती तटकरे म्हणाल्या “लवकरच.

TAGGED:
Share This Article