लाडक्या बहिणींसाठी ‘ही’ प्रक्रिया अनिवार्य; जाणून घ्या ऑनलाईन, ऑफलाईन प्रोसेस Ladki Bahin Yojana Aadhar Bank Link Process

2 Min Read
Ladki Bahin Yojana Aadhar Bank Link Process

Aadhar Bank Account Link for Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अट म्हणजे बँक खात आधार कार्डशी लिंक असण गरजेच आहे. आधीच अनेक महिलांचे अर्ज या कारणामुळे नाकारले गेले आहेत. आणि अनेक अर्ज मंजूर झालेल्या महिलांना या कारणामुळे पैसे मिळू शकले न्हवते. त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच बँक खात आधारशी लिंक असण खूप आवश्यक आहे. ही प्रक्रिया आता अनेक मार्गांनी, ऑनलाईन, ऑफलाईन, मोबाईल अॅप, एटीएम आणि एसएमएसद्वारे सहज करता येतो.

१. ऑफलाईन पद्धत – बँकेत जाऊन अर्ज भरणे

तुमच खात ज्या बँकेत आहे, तिथे जाऊन एक फॉर्म भरावा लागतो. आधार कार्डाची प्रत दिल्यानंतर बँक तपासणी करून खात आधारशी लिंक करते. याची पुष्टी एसएमएसद्वारे होते.

२. इंटरनेट बँकिंगद्वारे लिंकिंग

बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर “Link Aadhaar” शोधा, आधार नंबर टाका आणि कन्फर्म करा. यानंतर बँक आधार कार्ड लिंक करते व तुम्हाला याची माहिती एसएमएसद्वारे पाठवते.

३. एटीएमद्वारे आधार लिंकिंग

एटीएममध्ये कार्ड स्वाईप करून ‘Aadhaar Registration’ पर्याय निवडा, खाते प्रकार टाका आणि १२ अंकी आधार क्रमांक दोनदा टाका. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एसएमएसद्वारे माहिती दिली जाते.

४. बँकेच्या मोबाईल अॅपद्वारे लिंकिंग

बँकेच्या अॅपमध्ये लॉगिन करून ‘Services’ किंवा ‘Aadhaar Linking’ पर्यायातून आधार नंबर टाकून प्रक्रिया पूर्ण करता येते.

५. एसएमएसद्वारे लिंकिंग

मोबाईलवरून 567676 या क्रमांकावर “UIDAadhaar NumberAccount Number” या फॉरमॅटमध्ये मेसेज पाठवा. योग्य माहिती पाठवल्यास आधार लिंकिंगची पुष्टी एसएमएसद्वारे मिळेल.

Ladki Bahin Yojana लाभार्थींनी घ्यावयाची दक्षता:

आधार लिंक असल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही.
अर्ज करताना दिलेल खातच आधारशी लिंक असाव.
आधार क्रमांक अचूक टाकल्याची खात्री करा.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारने मंजूर केला ४१० कोटींचा निधी.

Share This Article