एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला मोठा दिलासा Ladki Bahin Yojana April Installment Begins Eknath Shinde Update

2 Min Read
Ladki Bahin Yojana April Installment Begins Eknath Shinde Update

Ladki Bahin Yojana April Installment Begins Eknath Shinde Update : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत एप्रिल 2025 चा 1500 रुपयांचा हप्ता 2 मे पासून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी ही अधिकृत माहिती देत सांगितले की, “पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थींना ही रक्कम मिळेल.”

लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हफ्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या करोडो महिलांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरातून “एप्रिलचा हप्ता अद्याप का मिळाला नाही?” असा सवाल उपस्थित होत होता. विशेषतः अक्षय्य तृतीयेला, म्हणजेच ३० एप्रिल रोजी हप्ता जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र हप्ता न आल्याने अनेक लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत स्पष्टता दिली आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही. विरोधक केवळ अफवा पसरवत आहेत. महिलांच्या सन्मानासाठी ही योजना सदैव सुरूच राहणार आहे.”

लाडकी बहिण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा केले जातात. निवडणुकांच्या काळात ही योजना महायुती सरकारच्या जाहीरनाम्यातील एक महत्त्वपूर्ण वचन ठरली होती.

अदिती तटकरे यांनी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे आता जमा होण्यास सुरूवात झाली असून, आज व उद्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

🔴 हेही वाचा 👉 या सरकारी योजनेत 10 हजार गुंतवून मिळवा 32 लाखांहून अधिक रक्कम – जाणून घ्या फायदेशीर फॉर्म्युला.

Share This Article