Ladki Bahin Yojana April Installment: एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात, तुमच्या खात्यात आले का पैसे?

2 Min Read
Ladki Bahin Yojana April Installment Maharashtra News

Ladki Bahin Yojana April Installment Maharashtra News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अक्षय्य तृतीया या शुभदिनी महिला आणि बालविकास विभागाने हप्त्याचे वितरण सुरू केल्याचे समजते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवशी, म्हणजे १ मे रोजी लाखो महिलांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी दिला जातो. तर पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थींना हप्त्याच्या रकमेचा फरक भरून काढण्यासाठी 500 रुपयांची रक्कम अतिरिक्त सन्मान निधी म्हणून दिली जात आहे. योजनेच्या अंमलबजावणीच्या निर्णयानुसार, ज्या महिलांना शासकीय योजनांमधून दरमहा 1000 रुपये मिळतात, त्यांच्यासाठी उर्वरित 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जात आहेत.

सदर योजना 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयांनुसार लागू करण्यात आली होती. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की, योजनेच्या अंमलबजावणीत 3 जुलैनंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, याची शासनाने खबरदारी घेतली आहे.

आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थींना 9 हप्त्यांमध्ये एकूण 13,500 रुपये वितरित करण्यात आले असून, एप्रिलचा हप्ता मिळाल्यानंतर ही रक्कम 15,000 रुपयांवर पोहोचणार आहे. शासनाच्या मते, ही योजना महायुतीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारी ठरली होती आणि ग्रामीण तसेच निमशहरी भागातील महिलांमध्ये यामुळे आर्थिक सशक्तीकरणाची नवीन उमेद निर्माण झाली आहे.

सध्या एप्रिल महिन्याचा हप्ता किती महिलांना वितरित झाला आहे, याबाबतची अचूक माहिती काही काळात उघड होणार आहे. मात्र, योजनेचा वेग आणि पारदर्शकता पाहता, लाखो महिलांना वेळेत आणि थेट त्यांच्या खात्यात हप्ता प्राप्त होणार असल्याची खात्री बाळगता येते.

🔴 हेही वाचा 👉 पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वेक्षणाची अंतिम मुदत वाढवली; पात्र कुटुंबांनी तात्काळ अर्ज करावा.

Share This Article