Ladki Bahin Yojana April Installment Update Aditi Tatkare : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र सण उलटून गेला तरी कोट्यवधी महिलांना अद्याप 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “एप्रिलचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल,” अस त्यांनी सांगितल. मात्र ‘लवकरच’ म्हणजे नेमक कधी – याबाबत त्यांनी कोणतीही स्पष्टता दिली नाही. त्यामुळे महिलांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
1500 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत आहेत महिला
‘लाडकी बहिण योजना’ ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला होता आणि निवडणुकीत महायुतीला त्याचा मोठा फायदा देखील झाला. मात्र, आता योजनेच्या अंमलबजावणीत सातत्याने उशीर, अपारदर्शकता आणि स्पष्ट माहितीच्या अभावामुळे लाभार्थींमध्ये नाराजी वाढत आहे.
“ लाडकी बहीण योजना चांगल्या प्रकारे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू” – अदिती तटकरे
कार्यक्रमादरम्यान अदिती तटकरे म्हणाल्या, “100 दिवसांच्या उपक्रमाचा निकाल लवकरच येईल. हे पुढच काम अधिक चांगल करण्यासाठी एक प्रेरणा ठरेल.” यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत कार्यक्षेत्र अधिक सशक्त बनवण्याची गरजही अधोरेखित केली.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींच्या हप्त्यावर फडणवीसांची चुप्पी; “निकालाची वाट बघा” म्हणत प्रश्न टाळला.