Ladki Bahin Yojana April Payment Status: तुमच्या खात्यात पैसे आले की नाही? 4 सोप्या स्टेप्समध्ये तपासा!

2 Min Read
Ladki Bahin Yojana April Payment Credited Bank Check

Ladki Bahin Yojana April Payment Credited Bank Check : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता अखेर पात्र महिलांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या करोडो महिलांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. सरकारकडून योजनेच्या रक्कमेची थेट खात्यात ट्रान्सफर प्रक्रिया सुरू असून बँक खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा झाल्याचे मेसेज अनेक महिलांना मिळाले आहेत.

अदिती तटकरे यांचा दिलासा: 2–3 दिवसांत सर्वांच्या खात्यात पैसे जमा

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केले आहे की, “पात्र लाभार्थींना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी आधार लिंक असलेल्या खात्यांमध्ये 2–3 दिवसांत पूर्णपणे ट्रान्सफर केला जाईल.

महिलांनी लगेच तपासा तुमचे खाते – ‘या’ 4 सोप्या स्टेप्स

  1. SMS मेसेज तपासा रक्कम जमा झाल्यानंतर बँकेकडून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज येतो.
  2. बँक अ‍ॅप/नेटबँकिंग वापरा बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून रक्कम जमा झाली आहे का ते तपासा.
  3. कस्टमर केअर कॉल करा
  • बँकेच्या हेल्पलाइनवर कॉल करून खात्यातील जमा रक्कम जाणून घ्या.
  1. थेट बँकेत जा ऑनलाईन सुविधा नसल्यास जवळच्या बँकेत जाऊन खात्याचे स्टेटमेंट मिळवा.

2100 रुपयांचे काय? महिलांमध्ये संभ्रम कायम

निवडणुकीदरम्यान महायुतीने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात सध्या फक्त 1500 रुपयेच जमा होत आहेत. मंत्री नरहरी झिरवळ यांनी महायुतीने कधीच 2100 रुपयांचे आश्वासन दिले नसल्याचे स्पष्ट केले असून, सरकारकडून ‘लवकरच देऊ’ असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की, वाढीव 2100 रुपये कधी मिळणार?

पुढचा हप्ता (मे 2025) बाबत काय?

एप्रिलचा हप्ता सध्या जमा झाला असला तरी मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सरकारकडून लवकरच पुढील हप्त्याची माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.

🔴 हेही याचा 👉 Swarnima Yojana Maharashtra: महिलांना स्वावलंबी करण्यासाठी केंद्र सरकारची ‘स्वर्णिमा योजना’ काय आहे? जाणून घ्या.

Share This Article