Ladki Bahin Yojana Latest Update : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारने मंजूर केला ४१० कोटींचा निधी

2 Min Read
Ladki Bahin Yojana Not Stopped 410 Crore Funding Approved

Ladki Bahin Yojana Latest Official Update 2025 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा आणि आरोपांना आता पूर्णविराम मिळाला आहे. महायुती सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तब्बल ४१०.३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, ही योजना पुढील काळातही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी सातत्याने टीका केली होती. निवडणुकीनंतर योजना गुंडाळली जाईल, असा आरोप करत ही योजना फसवी असल्याचे सांगण्यात येत होते. सध्या विशेषतः एप्रिल महिन्याचा हफ्ता अक्षय तृतीयेच्या दिवशी जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

मात्र आता महिला आणि बालविकास विभागाने अधिकृतपणे निधी खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. वित्त विभागाच्या निर्देशानुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी योजना राबवण्यासाठी ४१० कोटींच्या अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार विभागीय अधिकाऱ्यांनी खर्च करताना काटकसर आणि दक्षता बाळगण्याचे आदेशही दिले आहेत.

विशेष बाब म्हणजे, सरकारने लाडकी बहीण योजना बंद करण्याऐवजी त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तपासणी प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये तब्बल ५० हजार महिलांनी स्वेच्छेने योजनेचा लाभ सोडला, हे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटक योजनेंतर्गत आणि इतर सहाय्यक अनुदानांसाठी एकूण ३९६० कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्रपणे ४१०.३० कोटींची तरतूद आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये.

Share This Article