Ladki Bahin Yojana Sangli : सांगली जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द; खात्यात जमा होणार नाहीत 1500 रुपये

2 Min Read
Ladki Bahin Yojana Sangli Benefit Cancelled Subsidy March 2025 Update

सांगली | 3 मे 2025 : Ladki Bahin Yojana Sangli Benefit Cancelled Subsidy 2025 Update –  मार्च महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सांगली जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले होते. या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याचा लाभ मिळणार नाही. महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यातील अर्जांची तपासणी पूर्ण केली असून केवळ पात्र ठरलेल्या ६ लाख ६१ हजार महिलांच्याच खात्यावर 1500 रुपयांचे अनुदान जमा होणार आहे.

७८ हजार अर्ज अपात्र ठरण्यामागची प्रमुख कारणे

राज्य शासनाने पात्रतेचे निकष काटेकोरपणे लागू केल्याने अनेक महिलांचे अर्ज अपात्र ठरवले गेले आहेत. यात चारचाकी वाहन धारक, सरकारी किंवा खासगी नोकरी करणाऱ्या महिला, आयकर भरणाऱ्या, तसेच दुसऱ्या राज्यात स्थायिक झालेल्या महिलांचा समावेश आहे.

याशिवाय, बँक खात्यांमध्ये दुहेरी नावे असणे (१,१६६ प्रकरणे), एकाच प्रोफाइलवरून अनेक अर्ज (५७,१९२ प्रकरणे), आणि २०,१२० महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळणे, ही प्रमुख कारणे ठरली आहेत. या सगळ्यांमुळे ७८,४७८ अर्ज अंतिम यादीतून वगळले गेले आहेत.

येत्या 2-3 दिवसात जमा होणार हफ्ता

एप्रिल महिन्याच्या अनुदानाची रक्कम 2 एप्रिल 2025 पासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने यासाठी प्राधान्याने सत्यापन पूर्ण करत नवीन लाभार्थ्यांची यादी (Sangli Corporation Ladki Bahin Yojana List) तयार केली आहे.

काही महिलांनी स्वेच्छेने लाभ नाकारला

महत्त्वाचे म्हणजे, सांगली जिल्ह्यातील ७५ महिलांनी स्वखुशीतून योजनेचा लाभ नाकारत त्यासाठी लेखी अर्ज दिला आहे. त्यांचे उत्पन्न निकषापेक्षा जास्त असल्यामुळे किंवा नोकरीवर असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

शासनाकडून सखोल तपासणी सुरूच

Ladki Bahin Yojana List Sangli: संपूर्ण अर्ज प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी राज्य शासनाने तालुका आणि जिल्हास्तरावर अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू ठेवली आहे. यामुळे भविष्यातही काही अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 Maharashtra Board Result 2025: दहावी-बारावी निकाल सर्वात मोठी अपडेट! जाणून घ्या.

Share This Article