Lpg Price 1 May 2025 : इंडियन ऑईलने देशभरातील एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आज, 1 मे रोजी सुधारणा केली असून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सरासरी १७ रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापरासाठीचा १४.२ किलोचा एलपीजी सिलिंडर यावेळी स्थिर आहे.
व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर (१ मे २०२५):
- दिल्ली: ₹1747.50 (पूर्वी ₹1762)
- मुंबई: ₹1699 (पूर्वी ₹1713.50)
- कोलकाता: ₹1851.50 (पूर्वी ₹1868.50)
- चेन्नई: ₹1906.50 (पूर्वी ₹1921.50)
दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नोंदवलेला नाही. ८ एप्रिल रोजी ५० रुपयांची वाढ झाल्यानंतर हे दर स्थिर आहेत:
- दिल्ली: ₹853
- मुंबई: ₹852.50
- कोलकाता: ₹879
- चेन्नई: ₹868.50
पिएम उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना मोठा दिलासा:
देशात सध्या ३२.९ कोटी एलपीजी कनेक्शन असून त्यापैकी १०.३३ कोटी कनेक्शन उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ३०० रुपयांची सबसिडी मिळत असून सिलिंडर स्वस्त दरात उपलब्ध होत आहे.
सरकारी तरतूद आणि मागील अनुदान:
2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात एलपीजी सबसिडीसाठी 11,100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी 2022-23 मध्ये इंधन कंपन्यांना तोटा भरून काढण्यासाठी २२,००० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते.
🔴 हेही वाचा 👉 अल्पसंख्यांक योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा, लाभार्थ्यांसाठी सुविधा वाढवण्यावर भर.