Maharashtra Government 100 Days Report Top Performing Departments : महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने स्थापनेनंतर सुरुवातीचे 100 दिवस धोरणात्मक निर्णय, लोकाभिमुख उपक्रम आणि विकास योजनांसाठी आरक्षित केले होते. या कालावधीतील प्रगतीचे संपूर्ण मूल्यांकन करून सरकारने आपले 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केले आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा अहवाल सादर करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या 48 विभागांनी आपापल्या क्षेत्रात विशिष्ट उद्दिष्टांची आखणी करून काम सुरू केल होत. यामध्ये तब्बल 12 विभागांनी आपली 100 टक्के उद्दिष्टे साध्य केली, तर 18 विभागांनी 80 टक्क्यांहून अधिक उद्दिष्टे गाठली आहेत.
राज्यातील आघाडीचे 5 शासकीय विभाग:
- महिला व बालविकास विभाग – 80% उद्दिष्टपूर्ती
- सार्वजनिक बांधकाम विभाग – 77.95%
- कृषी विभाग – 66.15%
- ग्रामविकास विभाग – 63.85%
- परिवहन व बंदरे विभाग – 61.28%
सर्वोत्तम कामगिरी करणारे महापालिका आयुक्त:
- उल्हासनगर – 86.29%
- पिंपरी चिंचवड – 85.71%
- पनवेल व नवी मुंबई – प्रत्येकी 79.43%
पोलिस यंत्रणेत आघाडीवर:
- मीरा भाईंदर पोलीस आयुक्त – 84.57%
- ठाणे पोलीस आयुक्त – 76.57%
- मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त – 73.14%
विभागीय आयुक्तांमध्ये आघाडीवर:
- कोकण विभाग – 75.43%
- नाशिक आणि नागपूर विभाग – प्रत्येकी 62.29%
पोलीस परिक्षेत्र कामगिरी:
- कोकण परिक्षेत्र – 78.86%
- नांदेड परिक्षेत्र – 61.14%
राज्य सरकारच्या या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांची कार्यक्षमता, अंमलबजावणीची गती, आणि जनहिताची तत्परता यावर प्रकाश पडतो. नागरिकांना सरकारी यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने अशा अहवालांचा उपयोग महत्त्वाचा ठरतो.
🔴 हेही वाचा 👉राज्यातील विधवा महिलांसाठी दरमहा आर्थिक मदत, असा करा अर्ज.