PM Awas Yojana Changes 2025 : ग्रामीण भागात गरजू आणि गरीब कुटुंबांना स्वतःच घर मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) मध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. योजनेसाठी आवश्यक असलेले 13 निकष आता कमी करून 10 केले गेले असून, मासिक उत्पन्नाची अटही शिथिल करण्यात आली आहे.
योजनेत या नवीन सुधारणा केल्यानंतर आता अधिक लोक या योजनेसाठी पात्र ठरणार असून, गरजू लोकांना घरकुल मिळणे आता अधिक सोपे झाले आहे.
काय आहे बदल?
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना सरकारकडून ₹1.20 लाख (सामान्य भागात) किंवा ₹1.30 लाख (डोंगराळ भागात) इतकी आर्थिक मदत मिळते. पूर्वी पात्रतेसाठी 13 अटी अनिवार्य होत्या, परंतु आता केवळ 10 अटींच्या आधारे अर्जदाराची निवड होणार आहे.
कोणते निकष अजूनही लागू आहेत?
सद्यस्थितीत योजनेसाठी खालील प्रकारचे कुटुंब पात्र ठरू शकतात:
कुटुंबात कमावता सदस्य नसलेले
महिला प्रमुख असलेले कुटुंब
वयस्कर व्यक्तींमध्ये कोणीही साक्षर नसलेले
अपंग व्यक्ती असलेल्या कुटुंबांना
मजुरीवर अवलंबून भूमिहीन कुटुंब
ज्यांचे घर मोडकळीस आलेले किंवा एकाच खोलीपुरते सीमित आहे
अनुसूचित जाती-जमाती किंवा अल्पसंख्याक समुदायातील कुटुंब
वीज, शौचालय, गॅस कनेक्शन नसलेले घर
PM Awas Yojana 2025 सरकारने कोणत्या अटी रद्द केल्या?
केंद्र सरकारने यामधील तीन अटी काढून टाकल्या आहेत. आता दोन चाकी वाहन (जसे की स्कूटर) किंवा मच्छीमारीसाठी बोट असली तरी योजनेसाठी अर्ज करता येईल. शिवाय, मासिक उत्पन्न मर्यादा ₹10,000 वरून ₹15,000 करण्यात आली आहे, जे ग्रामीण कुटुंबांसाठी दिलासादायक आहे.
PM Awas Yojana अर्ज कधीपर्यंत करता येईल?
योजनेसाठीचा सर्वेक्षणाचा कालावधी 15 मे 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांचा अद्याप सर्वे झाला नाही त्यांनी वेळेत नोंदणी करावी.
सरकारच्या या निर्णयामुळे लाखो गरजू कुटुंबांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. नियम शिथिल झाल्यामुळे अनेक नवीन कुटुंब योजनेचा लाभ घेऊ शकतील.
🔴 हेही वाचा 👉 रेशनकार्डच्या अर्जाची माहिती थेट WhatsApp वर मिळणार.