Maharashtra Women Child Development : राज्य सरकारच्या “१०० दिवस कृती आराखडा” उपक्रमात महिला व बालविकास विभागाने उल्लेखनीय यश मिळवत ८०% गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी यामागील प्रयत्नांची माहिती दिली आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
हा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत मिळाला असून, राज्यातील कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विभागाचे आधुनिकीकरण, आणि लोकाभिमुख प्रशासन हे प्रमुख उद्दिष्ट होते.
यशाचे मुख्य टप्पे:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
– केवळ ३ महिन्यांत २.४७ कोटी महिलांना DBT द्वारे थेट आर्थिक लाभ
– ५० लाख महिलांचे आधार-सीडिंग पूर्ण, लाभ वितरणात पारदर्शकता
पोषण अभियान
– २.४५ कोटी लोकांचा सहभाग, ५१,००० SAM बालकांवर उपचार
– ३७,००० सेविकांचे प्रशिक्षण, ३५९५ शहरी बालविकास केंद्रांची स्थापना
डिजिटल आणि पारदर्शक प्रशासन
– E-Office प्रणालीचा ८५% वापर, RTI व RTS प्रणाली अद्ययावत
– ९५% तक्रारी वेळेत सोडविण्यात यश
महिला सक्षमीकरण व उद्योजकता
– २० लाख महिलांना MAVIM व नवतेजस्विनी योजनेतून उद्योजकतेची संधी
– Amazon, ONDC, GIZ यांसारख्या भागीदार संस्थांशी सहकार्य
राज्य-केंद्र समन्वयातून प्रभावी अंमलबजावणी
– १००% उद्दिष्ट पूर्ण, अन्न व पोषण, गृहभेटी आणि ग्रोथ मॉनिटरिंग यामध्ये उत्कृष्ट कामगिरी
“हे यश आकड्यांच नाही, सेविकांच आणि लाभार्थिनींच आहे” – अदिती तटकरे
या यशस्वी वाटचालीत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच विभागीय सचिव, आयुक्त, जिल्हा प्रशासन, आणि हजारो अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांचे योगदान असून, “ही कर्तव्यनिष्ठेची फळ आहेत, आकड्यांची नाही”, अस अदिती तटकरे यांनी नमूद केल.
या संपूर्ण यशाबद्दल तटकरे यांनी महिला व बालविकास खात्याच्या संपूर्ण टीमचे तसेच महाराष्ट्रातील नागरिकांचे आभार मानले. “पुढेही अशीच यशस्वी कामगिरी करू, हे वचन देते,” अस अदिती तटकरे म्हणाल्या.
🔴 हेही वाचा 🔴 लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता अजूनही नाही; अदिती तटकरे म्हणाल्या “.