लाडक्या बहिणींना दिलासा! “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेच्या एप्रिल महिन्याच्या निधीचे वाटप सुरू
Majhi Ladki Bahin Yojana April Installment Update,: महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी (₹1500) पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून (2 मे 2025) सुरू करण्यात आली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत हा निधी आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे.
महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी आज ट्विटर/X वरून यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “लाडकी बहिण योजना” ही महिला सशक्तीकरणासाठी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून, सरकारचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा आहे.
आधार लिंक केलेल्यांनाच मिळणार निधी
ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे, अशाच महिलांना एप्रिल महिन्याचा सन्मान निधी मिळणार आहे. त्यामुळे अजूनही काही लाभार्थिनींचे खाते आधारला लिंक नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींसाठी ‘ही’ प्रक्रिया अनिवार्य; जाणून घ्या ऑनलाईन, ऑफलाईन प्रोसेस.
प्रत्यक्षात प्रक्रिया विलंबाने सुरू झाली
एप्रिल महिन्याच्या निधीसंदर्भात अनेक लाडकी बहिणी प्रतीक्षेत होत्या. पूर्वी ३० एप्रिल रोजी, अक्षय तृतीयेनिमित्त निधी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात प्रक्रिया विलंबाने सुरू झाली. आता शासनाकडून निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होतील.
🔴 हेही वाचा 👉 खासगी वाहनांसाठी महाराष्ट्र कॅबिनेटचा मोठा निर्णय! कार पूलिंग सेवा कायदेशीर; वाहनधारकांना दिलासा.