“लाडकी बहिण” योजनेअंतर्गत सन्मान निधी ट्रान्सफर प्रक्रिया सुरू; ‘बँक सिडिंग स्टेटस’ तपासणे का गरजेचे? Ladki Bahin Yojana Bank Seeding Check

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Bank Seeding Check

मुंबई | २ मे २०२५ – Majhi Ladki Bahin Yojana Bank Seeding Check : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेअंतर्गत एप्रिल २०२५ महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया २ मे पासून सुरु झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत अधिकृत माहिती देत सांगितले की, पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थींना ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळेल.

दरम्यान, अनेक महिलांना योजनेचा वेळेत लाभ केवळ या कारणामुळे मिळत नाही की त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही. त्यामुळे बँक खाते ‘आधारशी लिंक’ असल्याची खात्री करणे ही आता अत्यंत गरजेची प्रक्रिया ठरली आहे.

बँक सिडिंग स्टेटस तपासणे का आवश्यक?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेचा सन्मान निधी पात्र महिलांच्या आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यांमध्येच ट्रान्सफर केला जातो. जर अर्जात नमूद केलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल, तर लाभ प्राप्त होणार नाही. त्यामुळे ‘बँक सिडिंग स्टेटस’ तपासणे हे प्रत्येक लाभार्थी महिलेसाठी आवश्यक आहे.

‘बँक सिडिंग स्टेटस’ कसे तपासावे?

  1. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जा: uidai.gov.in
  2. आपली इच्छित भाषा निवडा.
  3. ‘आधार सर्व्हिसेस’ या पर्यायावर क्लिक करा.
  4. ‘Check Aadhaar/Bank Linking Status’ या लिंकवर क्लिक करा.
  5. तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाका.
  6. आधार लिंक मोबाईलवर आलेला OTP वापरून लॉगिन करा.
  7. लॉगिननंतर आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही, याची स्थिती दर्शविली जाईल.

पुढे काय?

महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी. सरकारच्या मते, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे आर्थिक सशक्तीकरण गतीमान होत आहे आणि योजनेच्या निधी वितरणात पारदर्शकता राखली जात आहे.

🔴 हेही वाचा 👉 एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांना लाभ मिळतो का? जाणून घ्या नियम.

Share This Article