Minority Welfare Schemes Review Haj 2025: राज्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रगतीचा आढावा अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी मंत्रालयात घेतला. या बैठकीत योजना अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या.
बैठकीदरम्यान, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचे परीक्षण नियमितपणे करावे, अशी सूचना राज्यमंत्री मिसाळ यांनी केली. जैन आर्थिक विकास महामंडळासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित निधीसाठी प्रयत्न सुरु ठेवावेत, अशी सूचना देत त्यांनी लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रणालीची अंमलबजावणी करण्यावर भर दिला.
कर्ज वाटपाची प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, कर्ज वसुलीचे धोरण ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या.
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळावा यासाठी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी सांगितले. योजनांविषयी तक्रारी नोंदवण्यासाठी उपलब्ध असलेल्या १८२२५७८६ या टोल फ्री क्रमांकाचा प्रचार ग्रामीण भागात होणे गरजेचे असल्याच त्यांनी नमूद केल.
तसेच, पंजाबी आणि उर्दू साहित्य अकादम्यांना दिला जाणारा निधी साहित्यविषयक उपक्रमांसाठीच वापरावा आणि जास्तीत जास्त साहित्यिकांना त्याचा लाभ मिळेल याची काळजी घेण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर या वर्षी (Haj 2025) हज यात्रेसाठी १८,९४९ यात्रेकरू नोंदणी झाली असून, त्यांच्या प्रवासाची तयारी, निवास व सुरक्षेची व्यवस्था काटेकोरपणे करण्यात यावी, अशा सूचनाही बैठकीदरम्यान देण्यात आल्या.
🔴 हेही वाचा 👉 एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात, तुमच्या खात्यात आले का पैसे?.