Pan Card Loan Fraud Check Online : आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड हे केवळ आर्थिक व्यवहारासाठी नव्हे, तर तुमच्या ओळखीचाही महत्वाचा पुरावा मानल जात. पण अलीकडे पॅन कार्डचा गैरवापर करून कर्ज घेण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा परिस्थितीत अनेकांना हे देखील माहीत नसत की, त्यांच्या नावावर कुणीतरी बेकायदेशीररित्या लोन घेतलय का, किंवा त्यांच्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये काही गोंधळ झालाय का.
सरकारच्या विविध योजनांपासून ते आयटीआर, बँक व्यवहार आणि अगदी KYC प्रक्रिया करताना PAN कार्ड अनिवार्य असल्यामुळे याच्या दुरुपयोगाचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, घरबसल्या काही मिनिटांत तुम्ही स्वतःच्या PAN वर घेतलेल्या कर्जाची माहिती मिळवू शकता.
तुमच्या पॅन वर कोणी लोन घेतलय का? अस ऑनलाईन तपासा
PAN संबंधित कोणताही आर्थिक गैरवापर झालाय का, हे तपासण्यासाठी क्रेडिट स्कोर किंवा सिबिल अहवाल पाहणे आवश्यक आहे. यासाठी CIBIL च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन फ्री मध्ये तुमचा स्कोर आणि लोन डिटेल्स पाहता येतात.
ऑनलाईन प्रक्रिया:
- cibil.com या संकेतस्थळावर जा.
- Get your CIBIL Score या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन वापरकर्ते असल्यास, नोंदणी (Sign up) करा – तुमच नाव, जन्मतारीख, ईमेल आणि मोबाईल नंबर टाका.
- एक पासवर्ड तयार करून लॉगिन करा.
- आता तुमचा PAN नंबर, आणि मोबाईलवर आलेला OTP वापरून पुढे जा.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला क्रेडिट स्कोर आणि लोन सेक्शनमध्ये तुमच्या नावावर असलेली सर्व कर्ज माहिती दिसेल.
जर त्या यादीत तुम्ही घेतलेल नसलेल कोणतही लोन दिसत असेल, तर तो फ्रॉड किंवा गैरवापराचा प्रकार असू शकतो.
पॅन मध्ये चुकीची माहिती असल्यास अशा प्रकारे करा सुधारणा
जर पॅन कार्डवरील माहिती चुकीची असेल, किंवा अपडेट करायची असेल, तर खालीलप्रमाणे करा:
- https://www.incometax.gov.in या इनकम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- PAN नंबर आणि तुमच्या माहितीच्या आधारे लॉगिन करा.
- ‘PAN Correction’ किंवा ‘Update PAN Details’ या पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.
- फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक Tracking ID मिळेल – यावरून स्टेटस पाहता येतो.
सतर्क राहा आणि तुमची माहिती अपडेट ठेवा
जर तुमचं पॅन कार्ड चुकीच्या हातात गेलं, तर तुमच्या आर्थिक व्यवहारांवर आणि क्रेडिट हिस्ट्रीवर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, दर ६-१२ महिन्यांनी तुमचा क्रेडिट अहवाल पाहणे, आणि कोणतीही शंका असल्यास तात्काळ ती दूर करणे अत्यंत आवश्यक आहे.
🔴 हेही वाचा 👉 मोबाईलवर मिळवा हरवलेल आधार कार्ड – UIDAI ची ‘स्मार्ट ट्रिक’ आता सर्वांसाठी!.