PM Awas Yojana 2025 Survey Date Extended : पंतप्रधान ग्रामीण आवास योजना (PM Awas Yojana 2025) अंतर्गत लाभार्थ्यांच्या सर्वेक्षणासाठीची अंतिम मुदत १५ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम तारीख ३० एप्रिल निश्चित करण्यात आली होती. ग्रामीण विकास मंत्रालयाने सर्व राज्यांना याबाबत अधिकृत माहिती दिली असून, सर्वेक्षणाची प्रक्रिया नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना घरकुलाची सुविधा देण्यासाठी लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे. आतापर्यंत देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये तीन लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अहवाल जिल्हा मुख्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित अहवालांचे १० टक्के बीडीओ स्तरावर आणि २ टक्के जिल्हा स्तरावर फेरसत्यापन केले जाईल. अंतिम यादी तयार झाल्यानंतर ती राज्याच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात येणार असून, तेथून जिल्ह्यांना उद्दिष्ट ठरवून देण्यात येणार आहे.
ही योजना ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मोठी संधी आहे. पात्र लाभार्थ्यांनी सर्वेक्षण पूर्ण होण्याअगोदर आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवून लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढवलेली मुदत ही शेवटची मानली जात असून, मुदतीपूर्वी अर्ज न केल्यास पुढील टप्प्यात नवीन यादीत नावाचा समावेश होणार नाही.
🔴 हेही वाचा 👉 तुमच्याकड असलेली ₹५०० ची नोट खरी आहे की खोटी? आता 2 मिनिटात ओळखा बनावट नोट.