PM E Drive Scheme In Marathi : इलेक्ट्रिक वाहन विक्रीत झपाट्याने वाढ होत असतानाच केंद्र सरकारकडून PM E-Drive Scheme अंतर्गत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी मिळणारे अनुदान आता ४० दिवसांऐवजी फक्त ५ दिवसांत खात्यात जमा होणार आहे. यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार असून, इलेक्ट्रिक वाहने घेण्यास अधिक लोकांना प्रोत्साहन मिळणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी PM E-Drive Yojana
१ ऑक्टोबर २०२४ पासून भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी PM E-Drive योजना देशभर लागू केली आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, यासाठी एकूण १०,९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत २४.७९ लाख इलेक्ट्रिक दुचाकी आणि ३.१६ लाख तीन चाकी वाहनांना अनुदान देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या योजनेतून ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करताना पहिल्या वर्षी १०,००० रुपये आणि दुसऱ्या वर्षी ५,००० रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. Ola, Ather, TVS, Bajaj Chetak यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्स यामध्ये समाविष्ट आहेत.
ग्राहकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी PM E-Drive Portal वर जाऊन ई-व्हाउचरसाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर योग्य इलेक्ट्रिक वाहन निवडून खरेदी करताना संबंधित डीलरकडून ई-व्हाउचरची नोंदणी व अपलोड केली जाते. अनेक डीलर ही संपूर्ण प्रोसेस स्वतः पूर्ण करतात, त्यामुळे खरेदीदाराला फारसे काही करावे लागत नाही.
सरकारच्या या पावलामुळे प्रदूषण नियंत्रणात मदत होणार असून, इलेक्ट्रिक वाहनांची लोकांमधील लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 ७० वर्षांवरील सर्व नागरिकांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार.