PM Kisan Mandhan Yojana Pension Registration Details : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर दरमहा ३००० रुपयांची पेन्शन मिळते. ही योजना शेतकऱ्यांच्या वृद्धावस्थेतील आर्थिक स्थैर्य लक्षात घेऊन सुरु करण्यात आली आहे.
PM Kisan Mandhan योजनेची वैशिष्ट्ये
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा निश्चित पेन्शन दिली जाते. म्हणजेच, वयाच्या ६० वर्षांनंतर त्यांना दरवर्षी ३६,००० रुपये इतका लाभ मिळतो. विशेष बाब म्हणजे या योजनेसाठी शेतकऱ्यांनी दरमहा फक्त ५५ ते २०० रुपये इतकीच गुंतवणूक करावी लागते. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यांतूनच वजा केली जाते, त्यामुळे वेगळे पैसे भरण्याची अडचण येत नाही.
PM Kisan Mandhan Yojana पात्रता आणि अटी
अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
आधार कार्ड आणि मोबाईल नंबर अनिवार्य आहे.
शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे.
पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी नियमित मासिक योगदान आवश्यक आहे.
PM Kisan Mandhan Yojana नोंदणी कशी करावी?
PM Kisan Mandhan योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन PM Kisan Mandhan योजनेसाठी फॉर्म भरता येतो. नोंदणीच्या वेळी आधार कार्ड, बँक खाते तपशील, आणि मोबाईल नंबर आवश्यक असतो. अर्ज स्वीकारल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून दरमहा ठराविक रक्कम वजा केली जाते.
योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांचे वृद्धावस्थेतील जीवन अधिक सुरक्षित, स्वावलंबी आणि सन्माननीय करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. सरकारी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ सध्याच्या गरजांसाठीच नव्हे, तर भविष्यासाठीही आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
🔴 हेही वाचा 👉 शेतकऱ्यांनो सावधान! …नाहीतर फक्त 2च मिनिटात होईल बँक खात रिकाम!.