PM Kisan Samman Nidhi Fraud Alert : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. सध्या २०वा हफ्ता (Installment) देण्याची प्रक्रिया सुरू आहे, यामुळेच अनेक सायबर फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे या योजनेशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.
कशी केली जाते फसवणूक?
फसवणूक करणारे फोन किंवा मेसेजद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधतात. ते ई-केवायसी पूर्ण न झाल्यास हफ्ता रोखला जाईल, असा दावा करत आधार कार्ड क्रमांक, बँक खाते तपशील, OTP अशी संवेदनशील माहिती विचारतात. काही वेळा ते अशी भीती घालतात की, “आता लगेच ई-केवायसी केल नाही तर तुमचा अर्ज रद्द होईल.” अशा भूलथापांमध्ये अनेक शेतकरी फसतात आणि आपल्या खात्यातील पैसे गमावतात.
फसवणूक करणाऱ्या लिंकसपासून सावध
फसवणूक करणारे फेक मेसेजद्वारे एक लिंक पाठवतात आणि शेतकऱ्यांना त्या लिंकवर क्लिक करून ई-केवायसी करण्यास सांगतात. मात्र या लिंकमुळे तुमचा मोबाईल किंवा बँक खाते हॅक होऊ शकते आणि तुमच्या खात्यातील रक्कम काही क्षणांत नाहीशी होऊ शकते.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
- कोणत्याही अनओळखी कॉल, मेसेज किंवा लिंकवर विश्वास ठेवू नका.
- कोणालाही आपली वैयक्तिक माहिती किंवा OTP देऊ नका.
- अधिकृत माहितीसाठी PM-KISAN चा हेल्पलाइन क्रमांक 1800-180-1551 वर संपर्क साधा.
- तुमचा अर्ज किंवा हफ्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
सरकारी योजनेचा लाभ घेण्याआधी सतर्क राहा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असली तरी या योजनेच्या नावाखाली होणारी सायबर फसवणूक देखील अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे कोणतीही माहिती हवी असल्यास फक्त अधिकृत स्त्रोतांचा वापर करा आणि फसवणूक टाळा.
🔴 हेही वाचा 👉 Free Gas Cylinder Yojana Maharashtra: मोफत गॅस सिलेंडर साठी तुम्ही पात्र आहात? अर्जाची संपूर्ण प्रक्रिया येथे जाणून घ्या.