PM Kisan Yojana Update 2025 : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत मिळते, जी तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र पिएम किसान योजनेच्या नियमांबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे. विशेषतः शेतकऱ्यांकडून एकच प्रश्न वारंवार विचारला जातो, तो म्हणजे, एका कुटुंबातील सर्व सदस्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो का?
PM Kisan Yojana One Family Member Rule Marathi : सरकारच्या स्पष्ट नियमानुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ “शेतकरी कुटुंब” या एककाला दिला जातो. “शेतकरी कुटुंब” यामध्ये पती, पत्नी आणि 18 वर्षांखालील अल्पवयीन मुले यांचा समावेश होतो. त्यामुळे एका कुटुंबातील सर्व सदस्यांना स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेता येत नाही.
PM किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, एकाच कुटुंबातील केवळ एका सदस्याच्या नावावर हा लाभ मंजूर केला जातो आणि त्याच्याच बँक खात्यात दर तिमाही 2000 रुपये जमा होतात. हे पैसे थेट डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात.
24 फेब्रुवारी 2019 पासून ही योजना देशभरात सुरू करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 19 हप्ते वितरित झाले आहेत. पात्र शेतकरी आता 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
केंद्र सरकारने आता पिएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) आणि भूधारणा संबंधित कागदपत्रांचे सत्यापन बंधनकारक केले आहे. या गोष्टी वेळेत पूर्ण न केल्यास लाभ थांबवला जाऊ शकतो.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३००० रुपये; पात्रता, अटी व नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या.